Lokmat Money > बिझनेस न्यूज > खरेदीची रिपरिप कायम, सेन्सेक्स ८० हजारी; आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये घसरण

खरेदीची रिपरिप कायम, सेन्सेक्स ८० हजारी; आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये घसरण

चालू वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स १० टक्के तर मागील वर्षात २२ टक्क्यांनी वाढला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:26 AM2024-07-04T07:26:28+5:302024-07-04T07:26:56+5:30

चालू वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स १० टक्के तर मागील वर्षात २२ टक्क्यांनी वाढला.

Sensex touched an all-time high of 80,074 points while the Nifty also touched a peak of 24,307 points. | खरेदीची रिपरिप कायम, सेन्सेक्स ८० हजारी; आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये घसरण

खरेदीची रिपरिप कायम, सेन्सेक्स ८० हजारी; आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये घसरण

मुंबई - बाजाराने वाढीचा वेग सलग दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत बुधवारी आजवरचा ८०,०७४ अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला तर निफ्टीनेही २४,३०७ अंकांचे शिखर गाठले आहे. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ५४५ अंकांच्या वाढीनंतर ७९,९८६ अंकांवर स्थिरावला तर निफ्टी १६२ अंकांच्या वाढीनंतर २४२८६ वर स्थिर झाला. एका आठवड्यात बाजार ९५४ अंकांनी वधारला.

सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ शेअर्समध्ये वाढ तर ६ शेअर्समध्ये घट दिसून आली. बँकिंग, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली. टाटा कन्झुमर्सचे शेअर्स ३.५५ टक्के वाढल्याचे दिसून आले. बुधवारी मीडिया वगळून इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकामध्ये तेजी दिसून आली. आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये घसरण दिसून आली. चालू वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स १० टक्के तर मागील वर्षात २२ टक्क्यांनी वाढला.

आशियाई बाजारात तेजी
फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांनी अमेरिका पुन्हा चलनवाढीच्या मार्गावर असल्याचे संकेत दिल्यानंतर फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची व्यापाऱ्यांची अपेक्षा वाढली. त्यामुळे आशियाई बाजारात तेजी दिसून आली. जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियामधील इक्विटी बेंचमार्क वाढले. पॉवेल यांच्या ताज्या टिप्पणीमुळे गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने यूएस स्टॉक्स वाढले. पॉवेलने अलीकडील आर्थिक डेटाच्या चलनवाढीच्या मार्गाची प्रशंसा केली.

Web Title: Sensex touched an all-time high of 80,074 points while the Nifty also touched a peak of 24,307 points.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.