Join us

शेअर बाजारात मोठे चढउतार, दीड हजार अंकांनी घसरल्यानंतर सेंसेक्स सावरला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 1:44 PM

मुंबई शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाली असून,  सेंसेक्स सुमारे दीड हजार अंकांनी कोसळल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली

मुंबई - मुंबई शेअर बाजारामध्ये शुक्रवारी मोठे चढउतार दिसून आले.  सेंसेक्स सुमारे दीड हजार अंकांनी कोसळल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली. सकाळच्या सत्रात २७०.४५ अंकांनी वधारलेला सेंसेक्स दुपारच्या सुमारास तब्बल दीड हजार रुपयांनी कोसळला. तसेच राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्येही मोठी घसरण झावी. मात्र या घसरणीनंतर काही वेळातच सेंसेक्स सुमारे ६०० अंकांनी  सावरला. मात्र या घसरणीमुळे बँकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.   शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र घसरणीचा सर्वाधिक फटका बँकिंग क्षेत्रातील कंपन्या आणि गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना बसला. मात्र समभागधारकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे डीएचएफएलचे शेअर तब्बल ५० टक्क्यांनी तर यस बँकेचे शेअर सुमारे ३० टक्क्यांनी कोसळले. 

टॅग्स :व्यवसायनिर्देशांक