मुंबई : दिवसभराच्या अस्थिर परिस्थितीनंतर सत्राच्या अखेरीस जोरदार खरेदी झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0४.४६ अंकांनी वाढून २७,२१४.६0 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पुन्हा एकदा ८,२00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला आहे.
सकाळी बाजारात नरमाईचा कल होता. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ९३ अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली गेला होता. सत्राच्या शेवटच्या टप्प्यात मात्र जोरदार खरेदी झाली. त्यामुळे सर्व घसरण भरून काढून सेन्सेक्स २७,२१४.६0 अंकांवर बंद झाला. २0४.४६ अंकांची अथवा 0.७६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ५८.६५ अंकांनी अथवा 0.७२ टक्क्यांनी वाढून ८,२३८.१५ अंकांवर बंद झाला. त्याआधी सकाळी तो ८,१४७.६५ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या खरेदीमुळे ही घसरण भरून निघाली.
आजच्या वाढीचा लाभ मिळून सेन्सेक्स आणि निफ्टी साप्ताहिक वाढ नोंदविण्यात यशस्वी ठरले. या आठवड्यात सेन्सेक्स १३५.0९ अंकांनी अथवा 0.४९ टक्क्यांनी, तर निफ्टी ४८.४५ अंकांनी अथवा 0.५९ टक्क्यांनी वाढले.
खरेदी वाढल्याने सेन्सेक्स तेजीत
दिवसभराच्या अस्थिर परिस्थितीनंतर सत्राच्या अखेरीस जोरदार खरेदी झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0४.४६ अंकांनी वाढून २७,२१४.६0 अंकांवर बंद झाला.
By admin | Published: October 16, 2015 10:25 PM2015-10-16T22:25:40+5:302015-10-16T22:25:40+5:30