मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने २४ हजार अंशांच्या ऐतिहासिक सर्वोच्चांकाला स्पर्श केल्यानंतर आता सेन्सेक्स २५ हजार अंशांना स्पर्श करेल, असा सूर शेअर बाजारात उमटत आहे.
By admin | Published: May 14, 2014 09:01 AM2014-05-14T09:01:29+5:302014-05-14T09:07:14+5:30
मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने २४ हजार अंशांच्या ऐतिहासिक सर्वोच्चांकाला स्पर्श केल्यानंतर आता सेन्सेक्स २५ हजार अंशांना स्पर्श करेल, असा सूर शेअर बाजारात उमटत आहे.
२५ हजार अंशांचे वेध : तेजीने फुलला शेअर बाजार
मुंबई : विविध वृत्तवाहिन्यांतून प्रसारित झालेल्या एक्झिट पोल्सनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमताचे संकेत दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने २४ हजार अंशांच्या ऐतिहासिक सर्वोच्चांकाला स्पर्श केल्यानंतर आता शुक्रवारीपर्यंत सेन्सेक्स २५ हजार अंशांना स्पर्श करेल, असा सूर शेअर बाजारात उमटत आहे. शेअर दलालांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जी तेजी आहे, त्यात प्रामुख्याने स्थिर सरकार येईल, अशी अपेक्षा आहे. स्थिर सरकारमुळे आर्थिक सुधारणांचे धोरण प्राधान्याने राबविण्यात येईल व परकीय गुंतवणूकही वाढीस लागेल, असा तर्क मांडला जात आहे. तसेच, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २३0 ते २३५च्या आसपास जागा मिळतील व उर्वरित जागांसाठी काही पक्ष पुढे येऊन पाठिंबा देतील व बहुमत मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, १६ मे रोजी अर्थात मतमोजणीच्या दिवशी जर रालोआने बहुमताचा आकडा पार केला तर सेन्सेक्समध्ये किमान ७00 अंशांपर्यंत उसळी पाहायला मिळेल, असे मत शेअर बाजारतज्ज्ञ अनिमिष मेहता यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांच्या कारभारात सेन्सेक्स २५चा टप्पा पार करेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)