ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आज नवा उच्चांक गाठला असून बाजार उघडताच उसळी मारत सेन्सेक्स २९ हजारांच्या घरात पोचला. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी असून सलग तिस-या दिवशी सेन्सेक्सचा चढता आलेख दिसून आला आहे. दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असणारा निफ्टीही ८ हजार ७४५ वर पोचला आहे. आगामी अर्थसंकल्पाबद्दल गुंतवणूकदारांना आशा असल्यामुळे बाजाराने ही अभूतपूर्व तेजी पाहिली आहे