- प्रसाद गो. जोशी
जानेवारी ते मार्च महिन्यात एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये झालेली वाढ आणि यंदा सरासरीएवढा पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज अशा सकारात्मक बाबींपेक्षा आंतरराष्टÑीय व्यापार युद्धाची छाया, खनिज तेलाच्या वाढत्या किंमती आणि परकीय वित्तसंस्थांनी सुरू ठेवलेला विक्रीचा मारा यामुळे बाजार हेलकावत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढीव पातळीवर बंद झाला. बाजाराने ३५ हजारांची पातळी ओलांडली.
बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५०७४.३२ अंश असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्याने ३५४३८.२२ ते ३४७३५.११ अंशां
ंदरम्यान हेलकावे घेतले. सप्ताहाच्या अखेरीस तो ३५२२७.२६ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ३०२.३९
अंशांची म्हणजेच ०.८७ टक्कयांची वाढ झाली.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही संमिश्र वातावरण दिसून आले. येथील व्यापक पायावर आधारलेला निर्देशांक (निफ्टी) ९१.०५ अंश म्हणजेच ०.८६ टक्कयांनी वाढून १०६९६.२० अंशांवर बंद झाला. मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे त्याला १०७०० अंशांची पातळी राखता मात्र आली नाही. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घसरण झालेली बघावयास मिळाली. स्मॉलकॅप महिनाभरापासून घसरतोच आहे.
जानेवारी ते मार्च या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये ७.७ टक्कयांनी वाढ झाल्याची आकडेवारी गतसप्ताहात जाहीर झाली. भारताचा वृद्धीदर चीनपेक्षा अधिक आल्याचे बाजाराने स्वागत केले. पण या वाढीमुळे व्याजदरामधील कपात न होण्याची बळावलेली शक्यता आणि रिझर्व्ह बॅँकेची आगामी सप्ताहातील बैठक यासह विविध जागतिक समस्यांमुळे गुंतवणूकदारांनी सावध धोरण स्वीकारले. परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा मारा कायम राहिला.
अमेरिकेने आयातीवर लावलेल्या काही करांमुळे पुन्हा जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झालेली दिसून आली. त्याचाही प्रभाव बाजारावर पडला.
३७ आस्थापना बाजाराच्या अतिरिक्त निरीक्षणाखाली
- मुंबई शेअर बाजाराने ३७ आस्थापना बाजाराच्या अतिरिक्त निरीक्षणाखाली आणल्या आहेत. यामध्ये अ गटातील चार आस्थापना आहेत. यामध्ये बॉम्बे डार्इंग आणि रेन इंडस्ट्रीजसह रॅडिको खेतान आणि दिलीप बिल्डकॉन यांचा समावेश आहे.
- भांडवल बाजाराचे नियंत्रण करीत असताना मुंबई शेअर बाजारातर्फे आस्थापनांना विविध नियमांचे पालन करावे लागते. आता ज्या ३७ आस्थापना अतिरिक्त निरीक्षणाखाली आणण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर अन्य कोणतेही निर्बंध नसल्याचा खुलासा शेअर बाजाराने केला आहे. केवळ या आस्थापनांच्या व्यवहारांचे बाजाराकडून अधिक काटेकोरपणे निरीक्षण केले जाणार आहे.
- मुंबई शेअर बाजाराच्या या घोषणेनंतर या आस्थापनांच्या समभागांच्या किंमती शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे दिसून आले.
संवेदनशील निर्देशांक गेला ३५ हजारांच्या पुढे
जानेवारी ते मार्च महिन्यात एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये झालेली वाढ आणि यंदा सरासरीएवढा पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज अशा सकारात्मक बाबींपेक्षा आंतरराष्टÑीय व्यापार युद्धाची छाया, खनिज तेलाच्या वाढत्या किंमती आणि परकीय वित्तसंस्थांनी सुरू ठेवलेला विक्रीचा मारा यामुळे बाजार हेलकावत राहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:48 AM2018-06-04T00:48:54+5:302018-06-04T00:48:54+5:30