Lokmat Money > बिझनेस न्यूज > संवेदनशील निर्देशांकांची घोडदौड आता ६० हजारांकडे

संवेदनशील निर्देशांकांची घोडदौड आता ६० हजारांकडे

देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीत झालेली चांगली वाढ, जीएसटीचे वाढलेले संकलन आणि कोरोना लसीकरणाची वाढलेली गती यामुळे शेअर बाजारात जल्लोष होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:03 AM2021-09-06T07:03:39+5:302021-09-06T07:04:26+5:30

देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीत झालेली चांगली वाढ, जीएसटीचे वाढलेले संकलन आणि कोरोना लसीकरणाची वाढलेली गती यामुळे शेअर बाजारात जल्लोष होता. 

Sensitive indexes are now hovering around 60,000 | संवेदनशील निर्देशांकांची घोडदौड आता ६० हजारांकडे

संवेदनशील निर्देशांकांची घोडदौड आता ६० हजारांकडे

Highlightsदेशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीत झालेली चांगली वाढ, जीएसटीचे वाढलेले संकलन आणि कोरोना लसीकरणाची वाढलेली गती यामुळे शेअर बाजारात जल्लोष होता. 

प्रसाद गो. जोशी

जागतिक तसेच देशांतर्गत चांगल्या वातावरणामुळे शेअर बाजाराच्या जवळपास सर्वच निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली असून बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स लवकरच ६० हजारांचा टप्पा गाठण्याच्या बेतात आलेला दिसतो. त्यापाठोपाठच निफ्टीही २० हजारी बनण्याची आस लागली आहे. वाढलेले औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राचे उत्पादन, देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीत झालेली चांगली वाढ, जीएसटीचे वाढलेले संकलन आणि कोरोना लसीकरणाची वाढलेली गती यामुळे शेअर बाजारात जल्लोष होता. 

परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी
n गतसप्ताहामध्येही परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामध्ये जोरदार खरेदी केली. त्यामुळे बाजाराच्या वाढीचा वेग अधिक प्रमाणात वाढलेला दिसला. गेल्या सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी एकूण ६८६७.७३ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. मात्र, देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजारातील तेजीचा फायदा घेत नफा कमविण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे या संस्थांनी सप्ताहामध्ये १४२१.१२ कोटी रुपयांची विक्री केली आहे. 
n बाजार भांडवल मूल्याच्या वाढीचा विचार करता पहिल्या १० कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवल सर्वाधिक वाढले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो. 

n आगामी सप्ताहात शुक्रवारी जाहीर होणारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी त्याचप्रमाणे कोविडची रुग्णसंख्या आणि लसीकरणाचा वेग या महत्त्वाच्या बाबी आहेत.

गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक    बंद मूल्य    बदल
सेन्सेक्स   ५८,१२९.९५     २००५.२३
निफ्टी     १७,३२३.६०       ६१८.४०
मिडकॅप   २४,३८२.१९      ११२६ .८०
स्मॉलकॅप २७,३०५.३१     १०२१.१६

Web Title: Sensitive indexes are now hovering around 60,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.