Join us

सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुली ९४,४४२ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 7:15 AM

सणासुदीच्या हंगामात करवसुली वाढणार

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात वस्तू व सेवा कराची वसुली अल्प प्रमाणात वाढून ९४,४४२ कोटी रुपये झाली. आदल्या महिन्यात ९३,९६० कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता. वित्त मंत्रालयाने ही माहिती सोमवारी जारी केली. सप्टेंबर महिन्यात ६७ लाख जीएसटी विवरणपत्रे दाखल झाल्याचेही वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

सप्टेंबरमध्ये वसूल झालेल्या एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) १५,३१८ कोटी रुपये, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) २१,०६१ कोटी रुपये आहे. एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) ५०,०७० कोटी रुपये आहे. आयजीएसटीत २५,३०८ कोटी रुपये आयातीवरील कराचे आहेत. उपकर ७,९९३ कोटी रुपयांचा आहे. यात आयातीवरील ७६९ कोटींच्या उपकराचा समावेश आहे.

वित्त मंत्रालयाने म्हटले की, सप्टेंबर २०१८ मध्ये तडजोडीनंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी प्राप्त केलेल्या एकूण करात ३०,५७४ कोटी रुपयांचा सीजीएसटी आणि ३५,०१५ कोटी रुपयांचा एसजीएसटी यांचा समावेश आहे. आगामी काही महिने सणासुदीचे असल्यामुळे जीएसटी वसुलीत मोठी वाढ अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. कर तज्ज्ञांनी सांगितले की, जुलै आणि आॅगस्टमध्ये करांची वसुली ही नेहमीच नरम असते. गणेश चतुर्थीनंतर सणासुदीचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर, खऱ्या अर्थाने कर वसुलीला वेग येतो.कर कमी केल्यामुळेच्डेलाइट इंडियाचे भागीदार एम. एस. मनी यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन हे आॅगस्टमधील खरेदी-विक्रीचे निदर्शक आहे.च्सणासुदीचा हंगाम अद्याप पूर्णांशाने सुरू झालेला नाही, हे वसुलीच्या आकड्यांवरून दिसते. सरकारने मोठ्या संख्येतील वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केल्याचा परिणामही जाणवत आहे. 

 

टॅग्स :जीएसटीबँक