Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adar Poonawalla यांचा मोठा निर्णय;  Panacea Biotec मधल्या संपूर्ण हिस्स्याची विक्री

Adar Poonawalla यांचा मोठा निर्णय;  Panacea Biotec मधल्या संपूर्ण हिस्स्याची विक्री

Adar Poonawalla News: अदर पूनावाला यांनी पॅनेसिया बायोटेकच्या ३१,५७,०३४ शेअर्सची केली विक्री.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:01 AM2021-05-18T11:01:58+5:302021-05-18T11:03:11+5:30

Adar Poonawalla News: अदर पूनावाला यांनी पॅनेसिया बायोटेकच्या ३१,५७,०३४ शेअर्सची केली विक्री.

Serum Institutes Adar Poonawalla exits Panacea Biotec sells entire stake for Rs 118 crore | Adar Poonawalla यांचा मोठा निर्णय;  Panacea Biotec मधल्या संपूर्ण हिस्स्याची विक्री

Adar Poonawalla यांचा मोठा निर्णय;  Panacea Biotec मधल्या संपूर्ण हिस्स्याची विक्री

HighlightsAdar Poonawalla News: अदर पूनावाला यांनी पॅनेसिया बायोटेकच्या ३१,५७,०३४ शेअर्सची केली विक्री.कंपनीतून पूनावाला पडले बाहेर.

Adar Poonawalla News: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक मोठा निर्णय घेतला. सोमवारी त्यांनी पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec) मधील आपला ५.१५ टक्के हिस्सा खुल्या बाजारात करण्यात आलेल्या व्यवहाराअंतर्गत विकला. याद्वारे त्यांना ११८ कोटी रूपये मिळाले. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार एसआयआयनं (सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया) हे शेअर्स खरेदी केले.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीप्रमाणे अदर पूनावाला यांनी पॅनेसिया बायोटेकचे ३१,५ ७,०३४ शेअर्स ३७३,८५ रूपय प्रति शेअर्सच्या दरानं विकले. यामध्ये त्यांना एकूण ११८.०२ कोटी रूपये प्राप्त झाले. हे शेअर्स याच भावात एका निराळ्या व्यवहाराद्वारे एसआयआयनं खरेदी केले. 

पॅनेसियाच्या मार्च २०२१ च्या शेअरहोल्डिंगच्या आकडेवारीनुसार पूनावाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीत अनुक्रमे ५.१५ टक्के आणि ४.९८ हिस्स्यासह सार्वजनिक शेअरधारक होते. 

शारदा माइन्सकडूनही शेअर्सची विक्री

एका अन्य व्यवहारात शारदा माइन्सनं (Sarda Mines) जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे २२७.६६ कोटी रूपये मूल्याच्या शेअर्सची विक्री केली. कंपनीच्या ५२.७४ लाख शेअर्सची ४३१.६२ रूपये प्रति शेअर्स या दरावर विक्री करण्यात आली. सोमवारी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या शेअरचे दर ४.६५ टक्क्यांनी वाढून ४३६.५५ रूपये प्रति शेअरवर बंद झाला होता. 
 

Web Title: Serum Institutes Adar Poonawalla exits Panacea Biotec sells entire stake for Rs 118 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.