लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतातील सेवाक्षेत्रातील वृद्धी जुलै २०२३ मध्ये १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली. मागणीतील सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्री वाढीमुळे नव्या व्यवसायात झालेली वाढ त्यामुळे ही उच्चांकी वृद्धी झाली.
एस ॲण्ड पी ग्लोबलने जारी केलेल्या सेवाक्षेत्रातील घडामोडींचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जुलै २०२३ मध्ये वाढून ६२.३ वर गेला. जूनमध्ये तो ५८.५ वर होता. जून २०१० नंतरचा हा पीएमआयचा उच्चांक ठरला. सलग २४ महिन्यांपासून पीएमआय इंडेक्स ५० च्या वर आहे. ५०च्या वरील पीएमआय वृद्धी, तर ५०च्या खालील घसरण दर्शवितो.
निर्यातही वाढलीलिमा यांनी सांगितले की, सेवाक्षेत्रातील पीएमआयमधील वाढ ही आव्हानात्मक जागतिक आर्थिक परिदृश्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि यूएई यांसारख्या अनेक देशांना सेवांची निर्यात वाढली आहे, असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले.