Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेवा क्षेत्राची जोरदार उसळी, नोकऱ्याही वाढल्या, सेवा पीएमआय निर्देशांक १३ वर्षांच्या उच्चांकी

सेवा क्षेत्राची जोरदार उसळी, नोकऱ्याही वाढल्या, सेवा पीएमआय निर्देशांक १३ वर्षांच्या उच्चांकी

Services sector Jobs: भारतातील सेवा क्षेत्रातील आर्थिक घडामोडी १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. एचएसबीसी इंडिया सेवा पीएमआय निर्देशांक मार्चमध्ये वाढून ६१.२ अंकांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:22 AM2024-04-05T06:22:04+5:302024-04-05T06:22:13+5:30

Services sector Jobs: भारतातील सेवा क्षेत्रातील आर्थिक घडामोडी १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. एचएसबीसी इंडिया सेवा पीएमआय निर्देशांक मार्चमध्ये वाढून ६१.२ अंकांवर पोहोचला आहे.

Services sector rebounds, jobs rise, services PMI hits 13-year high | सेवा क्षेत्राची जोरदार उसळी, नोकऱ्याही वाढल्या, सेवा पीएमआय निर्देशांक १३ वर्षांच्या उच्चांकी

सेवा क्षेत्राची जोरदार उसळी, नोकऱ्याही वाढल्या, सेवा पीएमआय निर्देशांक १३ वर्षांच्या उच्चांकी

नवी दिल्ली - भारतातील सेवा क्षेत्रातील आर्थिक घडामोडी १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. एचएसबीसी इंडिया सेवा पीएमआय निर्देशांक मार्चमध्ये वाढून ६१.२ अंकांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये तो ६०.६ अंकांवर होता. विशेष म्हणदजे खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ५० च्या वर असल्यास विस्तार, तर ५० च्या खाली असल्यास संकोच दर्शवितो. 

एस अँड पी ग्लोबल इंडियाने सेवा क्षेत्रातील सुमारे ४०० कंपन्यांना पाठविलेल्या पश्नांच्या उत्तरांचे विश्लेषण करून एचएसबीसी इंडिया सेवा पीएमआय तयार केला आहे. एचएसबीसीचे अर्थतज्ज्ञ इनेस लॅम यांनी सांगितले की, मजबूत मागणीमुळे विक्री व अन्य व्यावसायिक घडामोडी वेगवान झाल्या आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्राचा पीएमआय वाढला आहे. सेवादात्यांनी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नोकर भरतीची गती ऑगस्ट २०२३ नंतर सर्वाधिक तेज केली आहे.

सर्व्हेक्षणात आणकी काय?
- या मासिक सर्वेक्षणात म्हटले आहे की, नव्या रोजगारातील वृद्धी नोव्हेंबर २०२२ नंतर सर्वाधिक मजबूत झाली आहे. 
- एचएसबीसी इंडिया कंपोजिट पीएमआय आउटपुट इंडेक्स फेब्रुवारीत ६०.६ वरून वाढून ६१.८ वर पोहोचला आहे. 
- ही मागील १३ वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मजबूत उसळी ठरली आहे.

Web Title: Services sector rebounds, jobs rise, services PMI hits 13-year high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.