करनीती भाग १६७ - सी. ए. उमेश शर्मा
सर्वप्रथम करदात्याने आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे. त्यामध्ये कम्प्लायंस मेनूमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन २०१६ या लिंकमध्ये जावे. त्यामध्ये त्याला बँकेचे नाव, अकाउंट नंबर, जमा केलेली रक्कम दिसेल. त्यानंतर, त्याला २ पर्याय आहे. १) बँक अकाउंट या पॅनशी निगडित आहे. जर हा पर्याय निवडला, तर करदात्याला सखोल माहिती द्यावी लागेल. २) बँक अकाउंट या पॅनशी निगडित नाही. जर हा पर्याय निवडला, तर आयकर विभाग याची शहानिशा करेल. जर पहिला पर्याय निवडला, तर त्याला नंतर त्याने ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ यामध्ये बँकेत जमा केलेली रक्कम जेवढी असेल, ती नमूद करावी व नंतर या रकमेची माहिती ७ प्रश्नांपैकी जे प्रश्न लागू असतील, त्यामध्ये द्यावी. हे ७ प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.
रोख रक्कम जर बँकेत असेल व ती ९ नोव्हेंबरनंतर बँकेत जमा केलेली असेल, तर बँकेचे नाव, आयएफ एससी कोड, अकाउंट नंबर, काढलेली रक्कम व टिप्पणी असेल, तर ते नमूद करावे लागेल.
जर रोख रक्कम ज्या व्यक्तीकडे पॅन आहे, अशा व्यक्तीकडून मिळाली असेल व त्याची माहिती असेल, तर त्या व्यक्तीने पॅन, नाव, व्यवसायाचा पत्ता, मिळालेली रक्कम व टिप्पणी नमूद करावी. व्यवहाराच्या प्रकारासाठी ६ पर्याय दिलेले आहे. :- १) रोख विक्री २) रोखीने कर्ज ३) रोखीने परतावा ४) रोखीने मिळालेली भेटवस्तू ५) रोखीने मिळालेली देणगी ६) इतर रोख
जर रोख रक्कम ज्या व्यक्तीकड पॅन नाही, अशा व्यक्तीकडून मिळाली व त्याची माहिती असेल तर त्याचे नाव, पत्ता, पिन, व्यवहाराच्या प्रकार (वरील ६ प्रमाणे जो असेल), रक्कम असे द्यावे लागेल.
बँकेत भरणा केलेली रक्कम कोणाकडून मिळाली, त्याची माहिती नसेल, तर व्यवहाराचा प्रकार (वरीलप्रमाणे जो असेल), रक्कम व टिप्पणी नमूद करावी लागेल.
बँकेत भरलेली रक्कम जर करमुक्त उत्पनातून मिळाली असेल, तर त्याची रक्कम व टिप्पणी द्यावी लागेल. उदा. जसे शेतीचे उत्पन्न.
बँकेत भरलेली रक्कम जर आधी बचत करून जमा केलेली असेल किंवा
मागील वर्षाच्या उत्पन्नातून असेल तर रक्कम व टिप्पणी द्यावी लागेल.
जर शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत गेले असेल किंवा जाणार असेल तर त्याची रक्कम नमूद करावी.
अर्जुन (काल्पनीक पात्र) : कृष्णा, १ फेबु्रवारी २०१७ पासून अनेक करदात्यांना आयकर विभागाच्या नोटिसांचे ईमेल व एसएमएस येत आहेत. करदात्यांनी याचे उत्तर कसे द्यावे व या नगद जमा करणाऱ्यांना नोटिसा का पाठवल्या जात आहेत, या बद्दल सविस्तर माहिती सांग.
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, शासनाने नोटाबंदीनंतर करचोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी चालू केलेले हे धोरण आहे. याला शासनाने ‘स्वच्छ धन अभियान’ असे नाव दिले आहे. आयकर विभागाने करदाते निवडून शहानिशा करण्यास नोटिसा पाठविल्या आहेत. पहिल्या बॅचमध्ये १८ लाख लोकांना ई-मेल व एसएमएसद्वारे नोटिसा पाठविल्या आहेत. एसएमएसमध्ये प्रत्युत्तर द्यावे, असे दिले आहे, तर ईमेलमध्ये रोख रक्कम बँकेत जमा केल्याची माहिती आहे. करदात्याला १० दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. यासाठी आयकर विभागात जाण्याची गरज नाही. उत्तर कसे द्यावे, कसे द्यावे, यासाठी आयकर विभागाने गाइड दिले आहे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने वरील माहिती देताना काय काळजी घ्यावी?
कृष्णा : अर्जुना, करदात्याच्या माहितीचा हिशेबाच्या पुस्तकाप्रमाणे व रिटर्न दाखल केले, त्याप्रमाणे मेळ बसला पाहिजे, तसेच बँक स्टेंटमेटप्रमाणे याचा मेळ बसला पाहिजे. जर दाखल केलेली माहिती योग्य नसली, तर परिणामाला सामोरे जावे लागेल. जर उत्तरच दिले नाही, तर आयकराच्या जाचक तरतुदींना सामोरे जावे लागेल. जर करदात्याने दिलेले उत्तर समाधानकारक असेल, तर त्याची परत चौकशी होणार नाही. जर ते समाधानकारक नसेल, तर चौकशी केलीे जाईल व अधिक माहिती विचारली जाईल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, सर्वांनी कर भरावा व देशाच्या प्रगतीत सहभागी व्हावे. जुन्या केलेल्या चुकांसाठी कर भरून मोकळे व्हावे, तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी शासनाने घ्यावी.
प्राप्तिकराच्या नोटिसांत महत्त्वाचे सात प्रश्न
सर्वप्रथम करदात्याने आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे. त्यामध्ये कम्प्लायंस मेनूमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन २०१६ या लिंकमध्ये जावे
By admin | Published: February 6, 2017 12:23 AM2017-02-06T00:23:53+5:302017-02-06T00:23:53+5:30