जेव्हा इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली तेव्हापासून. त्यातच सिलिंडरच्याही दरांत मोदी सरकारने गेल्या काही महिन्यांत २०० रुपयांनी वाढ केली आहे. या सगळ्याचा रोष समाजमाध्यमांतून व्यक्त होत असतोच. आता केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांनीच या 'आगीत' तेल ओतल्यासारखे झाले आहे. २०१४ पासून - म्हणजे मोदी सरकार दिल्लीत स्थापन झाल्यापासून- सिलिंडरच्या दरांत दुप्पट वाढ झाली आहे तर इंधनावरील करसंकलनात ४५९ टक्क्यांनी वृद्धी झाली असल्याची कबुली या खुद्द केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?
१ मार्च २०१४ रोजी १४ किलो वजनाच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर होता ₹४१०.५०
गेल्या दोन वर्षांत सिलिंडर आणि रॉकेल यांच्या किमतीत सातत्याने किरकोळ वाढ होत असल्याने त्यावरील अनुदान कमीकमी होत चालले आहे
२०१४च्या मार्च महिन्यात स्वस्त धान्य दुकानांतून (रेशन) मिळणाऱ्या रॉकेलची किंमत १४.९६ रुपये प्रतिलिटर एवढी होती. मात्र, तीच किंमत यंदाच्या मार्च महिन्यात ३५.३५ रुपये एवढी झाली आहे
इंधनावरील करआकारणीतून सरकारला मिळालेला महसूल
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती
n मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे ९७.५७ आणि ८८.६० रुपये प्रतिलिटर एवढ्या आहेतn इंधनाचे देशांतर्गत दर ठरविण्याची जबाबदारी तेल उत्पादक कंपन्यांकडे सोपविण्यात आली आहेn १९ ऑक्टोबर २०१४ रोजीपासून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यांसारख्या कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला इंधनाच्या किमती ठरवतातn आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार या किमतींत चढ-उतार होत असतो