Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2 रुपयांच्या शेअरने दिला 16000% परतावा; 1 लाखाचे झाले 1.52 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

2 रुपयांच्या शेअरने दिला 16000% परतावा; 1 लाखाचे झाले 1.52 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

SG Finserve Share: 2 रुपयांच्या शेअरने दिला 16000% परतावा; 1 लाखाचे झाले 1.52 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:40 PM2024-04-01T18:40:11+5:302024-04-01T18:40:52+5:30

SG Finserve Share: 2 रुपयांच्या शेअरने दिला 16000% परतावा; 1 लाखाचे झाले 1.52 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

SG Finserve Share: Rs 2 share gave 16000% return; 1 lakh become 1.52 crores | 2 रुपयांच्या शेअरने दिला 16000% परतावा; 1 लाखाचे झाले 1.52 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

2 रुपयांच्या शेअरने दिला 16000% परतावा; 1 लाखाचे झाले 1.52 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

G Finserve Share: शेअर बाजारात अनेक मल्टीबॅगर शेअर्स आहेत, ज्यांनी अल्पावधीत मोठा परतावा दिला आहे. असाच एक शेअर SG Finserv चा आहे, ज्याने गेल्या 4 वर्षात बंपर परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये या शेअरची किंमत फक्त 2.8 रुपये होती, जी आता सुमारे ₹429 पर्यंत वाढली आहे. म्हणजेच, या शेअरने 16,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. 

शेअरची सध्याची स्थिती
एखाद्या व्यक्तीने मार्च 2020 मध्ये या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असतील, तर त्याला आता ₹ 1.52 कोटी मिळतील. पण, गेल्या वर्षात स्टॉकमध्ये सुमारे 14 टक्क्यांनी घसरण झाली होती. पण, यानंतर या वर्षी पुन्हा स्टॉकमध्ये वाढ झाली.

सलग 2 महिन्यांच्या घसरणीनंतर एप्रिलच्या पहिल्या सत्रात या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. यापूर्वी मार्चमध्ये 9 टक्के तर फेब्रुवारीमध्ये 10 टक्क्यांहून अधिक घट झाली होती. सध्या हा शेअर ₹429 वर आहे. या स्टॉकचा सर्वकालीन उच्चांक 26 मे 2023 रोजी ₹748 होता.

कंपनीकाय करते
SG Finserv Limited ची स्थापना 1994 मध्ये झाली. SG Finserv Limited ब्रोकिंग, डिस्ट्रिब्यूशन, इन्व्हेस्टमेंट रिसर्च, ऑनलाइन ट्रेडिंग, फंड मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि विमा सेवा प्रदान करते. कंपनी पूर्वी मुंगीपा सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. 

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: SG Finserve Share: Rs 2 share gave 16000% return; 1 lakh become 1.52 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.