Lokmat Money > बिझनेस न्यूज > Shaadi.com IPO: जोड्या ऑनलाईन बनतात! Shaadi.com चा आयपीओ येतोय; जुळवा किती जुळवायचे तेवढे...

Shaadi.com IPO: जोड्या ऑनलाईन बनतात! Shaadi.com चा आयपीओ येतोय; जुळवा किती जुळवायचे तेवढे...

भारतीय शेअर बाजारात पेटीएम, झोमॅटो, एलआयसीच्या शेअरनी गटांगळ्या खाल्ल्या आहेत. या कंपनीने 2009 मध्ये देखील IPO आणण्याची तयारी सुरु केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 05:39 PM2022-09-09T17:39:29+5:302022-09-09T17:40:33+5:30

भारतीय शेअर बाजारात पेटीएम, झोमॅटो, एलआयसीच्या शेअरनी गटांगळ्या खाल्ल्या आहेत. या कंपनीने 2009 मध्ये देखील IPO आणण्याची तयारी सुरु केली होती.

Shaadi.com IPO: Couples Make Online! Shaadi.com's IPO Coming; Match how much to match... | Shaadi.com IPO: जोड्या ऑनलाईन बनतात! Shaadi.com चा आयपीओ येतोय; जुळवा किती जुळवायचे तेवढे...

Shaadi.com IPO: जोड्या ऑनलाईन बनतात! Shaadi.com चा आयपीओ येतोय; जुळवा किती जुळवायचे तेवढे...

लोकांची लग्ने जुळविणारी कंपनी Shaadi.com आपला आयपीओ आणण्याच्या तयारीला लागली आहे. ही वेबसाईट चालविणारी कंपनी पिपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल यांनीच याची माहिती दिली आहे. सध्या कंपनी फायद्यात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

आम्ही सध्या फायद्यात आहोत. आम्ही आयपीओ आणण्याची तयारी करत आहोत. मात्र, सध्यातरी आम्हाला पैशांची गरज नाहीय. पुढील वर्षीपर्यंत आम्ही शादी डॉट कॉमचा आयपीओ लाँच करू, असे मित्तल म्हणाले. 

या कंपनीने 2009 मध्ये देखील IPO आणण्याची तयारी सुरु केली होती. परंतू काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. मित्तल यांनी 1996 मध्ये Shaadi.com ची स्थापना केली. नंतर, त्यांनी 2001 मध्ये पीपल ग्रुपची स्थापना केली. शादी डॉट कॉम या पीपल ग्रुपच्या अधिपत्याखाली येते. मित्तल यांचा कंपनीत मोठा हिस्सा आहे. त्यांच्यासोबत व्हेंचर कॅपिटल फर्म समा कॅपिटलचाही छोटा हिस्सा आहे.

Shaadi.com व्यतिरिक्त, पीपल ग्रुपकडे रियल इस्टेट वेबसाइट Makaan.com आणि मोबाइल गेमिंग फर्म मौज मोबाइलची देखील मालकी आहे. Jeevansathi.com चालवणारी Info Edge (India) Limited ही आधीच शेअर बाजारात लिस्टेड आहे. भारत मॅट्रिमोनी मॅट्रिमोनी डॉट कॉमची मालक आहे. इंफो एजला २००६ मध्ये तर Matrimony.com २०१७ मध्ये शेअर बाजारात लिस्ट करण्यात आले होते. 

भविष्यात येणारे महत्वाचे आयपीओ...
भारतीय शेअर बाजारात पेटीएम, झोमॅटो, एलआयसीच्या शेअरनी गटांगळ्या खाल्ल्या आहेत. अशावेळी टाटा मोटर्स तिच्या उपकंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. टाटा ग्रुपमध्ये बऱ्याच वर्षांनी आयपीओ आणण्यात येणार आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लाँच करण्याची तयारी सुरु झाली आहे. Tata Technologies ही जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल मशिनरी आणि इंडस्ट्रियल व्हर्टिकलमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज उतरली आहे.
इलेक्ट्रीक वाहन निर्माता Omega Seiki मोबिलिटी देखील आयपीओद्वारे (IPO) शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी करत आहे. कंपनी पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत 200 ते 250 मिलियन डॉलर्सचा IPO लॉन्च करेल. 
 

Web Title: Shaadi.com IPO: Couples Make Online! Shaadi.com's IPO Coming; Match how much to match...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.