Join us

RBI Governor Shaktikant Das : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 9:52 AM

RBI Governor Shaktikant Das : १० डिसेंबर २०२१ रोजी शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ होणार होता पूर्ण.

RBI Governor Shaktikant Das : केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता शक्तिकांत दास हे डिसेंबर २०२४ पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यरत राहणार आहेत.

शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण होणार होता. अधिकृत निवेदनानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पुनर्नियुक्ती १० डिसेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाकाळात अनेक प्रयत्नसरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अशातच शक्तिकांत दास यांनी या पदी राहिल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत मिळू शकते. शक्तिकात दास यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात आणि विकासाचं समर्थ करणं, बिकट परिस्थितीत लिक्विडीटी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 

कोण आहेत शक्तिकांत दास?रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रं सोपवण्यात आली. शक्तिकांत दास यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून एमएची पदवी मिळवली. ते तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आर्थिक प्रकरणांच्या सचिवाच्या रूपात आपल्या कार्यकाळादरम्यान भारतातील सर्वात शक्तिवान लोकांच्या स्वरूपात त्यांना पाहिलं जात होतं. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास