नवी दिल्ली - मोहमद्द शामी आणि त्याती पत्नी यांच्यात सुरु असलेल्या वादामध्ये दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे शामीने यापूर्वी म्हटले आहे. त्यात आणखी भर पडली आहे. शामीने पत्नीने आपल्यापासून पहिल्या लग्नाची गोष्ट लपवली होती असा गौप्यस्फोट केला आहे.
हसीनने विवाहित असल्याची गोष्ट आपल्यापासून लपवली होती. इतकेच नाही तर तिने तिच्या मुलांबद्दलही मला खोटं सांगितले, ही मुले माझ्या मरण पावलेल्या बहिणीची मुले आहेत असे सांगितले होते असा दावा शामीने एका हिंदी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्सची चीअरलीडर्स होती. त्यावेळी तिची आणि माझी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर आधी प्रेमात झाले. त्यानंतर या लग्न केले. हसीनच्या मुलींचे सुरुवातीच्या काळात मी भरपूर लाड केले. त्यांना कपडे आणून देत असे तसेच फिरायला नेत असे असे शामीने सांगितले.
हसीन माझ्या कार्डने शॉपिंग करायची; वर्षभरात संपवले दीड कोटी
पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहेत. पण या आरोपांना प्रत्यूत्तर द्यायला शामीनेही सुरुवात केली आहे. शामीने मला कधीच न्याय दिला नाही, असे हसीनचे म्हणणे होते. पण हसीनने माझ्या डेबिट कार्डमधून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा शामीने यावेळी केला आहे. गेल्या आठवड्यात हसीनने फेसबुकच्या माध्यमातून शमीवर दगा दिल्याचा आरोप करताना कौटुंबिक कलहाची बळी ठरल्याचे म्हटले होते. दरम्यान, शमीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावताना हा मला बदनाम करण्याचा व कारकीर्द संपविण्याचा कट असल्याचे म्हटले होते.
शामी एक पत्नी म्हणून मला चांगली वागणूक देत नव्हता, असे हसीनचे म्हणणे होते. पण शामीने आपण कुटुंबियाला वेळ देत होतो, असे सांगितले. तो म्हणाला की, " हसीन नेहमीच माझ्याव संशय घ्यायची. आरोप करायची तर तिची जुनीच सवय आहे. जर मी तिला न्याय देत नव्हतो, असे हसीनचे म्हणणे आहे, पण तसे अजिबात नाही. कारण माझ्या बँकेचे डेबिट कार्ड तिच्याकडेच असायचे. अका वर्षात तब्बल दीड कोटी रुपये हसीनने खर्च केले आहेत.
ममता बॅनर्जी सोडवणार का मोहम्मद शामी आणि हसीन यांच्यातील भांडण?
राजकारणातील बरीच कोडी सोडवणाऱ्या ममता दीदी आता शामी आणि हसीन यांच्यातील भांडण सोडवणार का? याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. एका महिला मुख्यमंत्र्यांनी सामान्य महिलेची मदत करावी, अशी मागणी हसीनने केली आहे. हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे. पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यावर हसीनने बुधवारी ममता यांच्याकडून मदत मागितली आहे. हसीनने हे सारे प्रकरण ' दीदीं 'ना सांगितले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात मुख्यमंत्री या नात्याने आपण हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही हसीनने दीदीं 'ना केली आहे. शामीवर आरोप केल्यावर मला धमक्या मिळत आहेत, त्यामुळे मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी हसीनने दीदीं 'ना केली आहे.