Join us  

"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनू नायडूंनी केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 4:11 PM

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शंतनू नायडू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे तीन दिवसापूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पूर्ण देशावर शोककळा पसरली. टाटा यांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनू नायडू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'रतन टाटा यांना पुन्हा कधीही हसताना पाहता येणार नाही',असं लिहिले आहे.

बुधवारी रात्री उशिरा उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरून गेला. शंतनु नायडू हे रतन टाटा यांचे जवळचे होते. ते टाटा ट्रस्टचे सर्वात तरुण व्यवस्थापक देखील आहेत.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन

शंतनु नायडू यांनी गेल्या तीन दिवसांत ज्यांनी त्यांना शोकसंदेश पाठवले होते त्यांचेही आभार मानले. त्यांचा काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात त्यांच्या गळ्यात पडून एक पोलिस अधिकारी रडत असल्याचे दिसत आहे. शंतनू यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'शेवटी बसून गोष्टी अनुभवण्याची संधी मिळाली. तरीही मी त्यांना पुन्हा कधीही हसताना पाहणार नाही किंवा त्यांना हसण्याची संधी देणार नाही हे सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

शंतनु यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, गेल्या ३ दिवसांत देशभरातून अनोळखी व्यक्तींनी खूप मेसेज पाठवले आहेत. हे वाचून असे वाटते की तुम्ही आणि मी वर्षानुवर्षे कुटुंब आहोत. प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटले की दुःख संपेल, तेव्हा तुमच्यापैकी एकाचा संदेश किंवा हावभाव मला थोडे प्रोत्साहन देईल.

पुढे लिहिले की, मुंबईचे हे उदार पोलीस कर्मचारी इतके दयाळू होते की त्यांनी संपूर्ण शहराला मिठी मारली. ही एक निरोपाची भेट वाटली. धन्यवाद, मी खरोखर तेच म्हणत आहे. 

शंतनु नायडू यांची ही सोशल मिडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. नेटकरी या पोस्टला कमेंट करत रतन टाटा यांच्या आठवणी सांगत आहेत. 

टॅग्स :रतन टाटा