Join us

Shapoorji Pallonji Group नं बनवली नवी रियल इस्टेट कंपनी, लवकर आणू शकते ₹७५०० कोटींचा IPO; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:31 PM

शापूरजी पालोनजी समूहानं देशभरात पसरलेल्या आपल्या रिअल इस्टेट मालमत्तांचं व्यवस्थापन करण्यासाठी शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट (एसपीआरई) नावाची नवीन होल्डिंग कंपनी स्थापन केली आहे.

शापूरजी पालोनजी समूहानं (Shapoorji Pallonji Group) देशभरात पसरलेल्या आपल्या रिअल इस्टेट मालमत्तांचं व्यवस्थापन करण्यासाठी शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट (एसपीआरई) नावाची नवीन होल्डिंग कंपनी स्थापन केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या कंपनीला सार्वजनिक करण्याचा ग्रुपचा विचार आहे, म्हणजेच येत्या काळात एसपीआरईचा आयपीओही लाँच केला जाऊ शकतो. शापूरजी पालोनजी समूहानं त्यांच्या मालमत्तेचं मॉनिटायझेशन करण्यासाठी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या मुख्य धोरणाचा एक भाग म्हणून हे पाऊल उचललं आहे.

नवीन कंपनीचं उद्दीष्ट मूल्य अनलॉक करणं, व्यवसाय सुरळीत करणं आणि २,००० एकरमध्ये पसरलेल्या भूखंडांसह सर्व रिअल इस्टेट पोर्टफोलिओच्या मुद्रीकरणाचा मार्ग मोकळा करणं हा आहे. या मालमत्तेचे मूल्य सुमारे ६ अब्ज डॉलर असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

"व्यवसाय सुरळीत करणं आणि शेअरधारकांसाठी एक असेट तयार करण्याची आमची रणनीती आहे. या रणनितीअंतर्गत इंटिग्रेटेड होल्डिंग कंपनी तयार करणं आणि त्या अंतर्गत असेट्सना कन्सोलिडेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असं नव्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व्यंकटेश गोपालकृष्णन यांच्या हवाल्यानं रिपोर्टमध्ये म्हटलं. 

४५ प्रकल्पांचा समावेश

एसपीआरईमध्ये आता शापूरजी पालोनजी समूहाच्या संपूर्ण रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा समावेश आहे, ज्यात ४५ भूखंड आणि प्रकल्पांचा समावेश आहे. ही मालमत्ता प्रामुख्याने मुंबई, पुणे, बंगळुरू, गुरुग्राम आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांमध्ये आहे. याशिवाय म्हैसूर आणि नागपूर येथेही कंपनीची मोठी जमीन आहे.

रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या आयपीओअंतर्गत पहिल्या टप्प्यात १० ते १२ टक्के हिस्सा विक्रीसाठी ठेवू शकते, त्या बदल्यात ८० ते ९० कोटी डॉलर (सुमारे ७,५०० कोटी रुपये) उभारण्याचा प्रयत्न करेल. मग हळूहळू अधिक हिस्साही विकता येऊ शकतो.

टॅग्स :व्यवसायइनिशिअल पब्लिक ऑफरिंग