Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Buyback: कमाईची जबरदस्त संधी; दिग्गज IT कंपनी 12000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार...

Share Buyback: कमाईची जबरदस्त संधी; दिग्गज IT कंपनी 12000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार...

IT Sector: तुमच्याकडेही या कंपनीचे शेअर्स असतील, तर तुमच्याकडे कमाईची चांगली संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:47 PM2023-04-27T21:47:54+5:302023-04-27T21:48:08+5:30

IT Sector: तुमच्याकडेही या कंपनीचे शेअर्स असतील, तर तुमच्याकडे कमाईची चांगली संधी आहे.

Share Buyback: Tremendous Earning Opportunity; Giant IT company to buyback shares worth Rs 12000 crore | Share Buyback: कमाईची जबरदस्त संधी; दिग्गज IT कंपनी 12000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार...

Share Buyback: कमाईची जबरदस्त संधी; दिग्गज IT कंपनी 12000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार...


Wipro Share Price: शेअर मार्केटमध्ये चांगली कमाई करण्याच्या अनेक संधी आहेत, फक्त त्या संधी योग्यवेळी सापडायला पाहिजे. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच शेअर्स बाय बॅक करण्याचेही जाहीर केले आहे. शेअर बायबॅक करुन गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळू शकतो.

माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 0.4 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 3,074.5 कोटी रुपये होता. यासोबतच कंपनीने 26.96 कोटी इक्विटी शेअर्सचे बायबॅकही जाहीर केली आहे. 

कंपनीचा नफा
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3,087.3 कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत त्यांचा महसूल वार्षिक 11.17 टक्क्यांनी वाढून 23,190.3 कोटी रुपये झाला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 7.1 टक्क्यांनी घसरून 11,350 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 90,487.6 कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जो 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.4 टक्के अधिक आहे.

शेअर बायबॅक
विप्रोच्या बोर्डाने 445 रुपये प्रति शेअर दराने 26.96 कोटी इक्विटी शेअर्स बायबॅक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एकूण पेड-अप इक्विटी शेअर्सपैकी हे शेअर्स 4.91 टक्के आहेत. शेअर बायबॅकसाठी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कंपनीने सांगितले की, त्यांचा प्रमोटर्स ग्रुप आणि प्रमोटर्स सदस्यांनी प्रस्तावित शेअर बायबॅक प्रक्रियेत सहभागी होण्याचा त्यांचा मानस व्यक्त केला आहे.

Web Title: Share Buyback: Tremendous Earning Opportunity; Giant IT company to buyback shares worth Rs 12000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.