लक्ष्मीपूजनाच्या आजच्या मुहूर्ताच्या दिवशी आपल्या मनाची एकाग्रता आणि दृढनिश्चय अधिक स्थिर करा. एखादा उत्तम शेअर घेतला आणि जर त्याचा भाव खाली आला तर मन चंचल होता कामा नये. बाजारात तेच गुंतवणूकदार यशस्वी होतात जे 'लंबी रेस के घोडे' आहेत, म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीवर ज्यांचा विश्वास आहे असे. होल्डिंग कॅपॅसिटी ज्यांची जास्त तेच बाजारातून उत्तम नफा कमावून जातात. इतर सर्व बाजारास स्वतःच्या खिशातून पैसे देऊनच बाहेर पडतात. आज 'डी' या इंग्रजी अक्षरापासून सुरु होणाऱ्या काही उत्तम कंपन्यांच्या शेअर्स विषयी...
डाबर इंडिया - एफ एम सी जी क्षेत्रातील आयुर्वेदिक उत्पादने बनविणारी नामवंत कंपनी. च्यवनप्राश, मध, लाल तेल, बदाम तेल, पुदिना हरा, हाजमोला, ओडोनील, डाबर लाल पेस्ट इत्यादी ब्रँड्स बाजारात आपण पाहतोच. याच बरोबर ही कंपनी अनेक आयुर्वेदिक उत्पादने बनविते आणि विक्री करते.
फेस व्हॅल्यू - रुपये १/- प्रति शेअर
सध्याचा भाव ; रु. ५३८/- प्रति शेअर
मार्केट कॅप - रु ९५ हजार कोटी
भाव पातळी - वार्षिक हाय रु ६३२/- आणि लो ४८२/-
बोनस शेअर्स - १९९३ ते २०१३ दरम्यान ४ वेळा
शेअर स्प्लिट - १:१० नोव्हेंबर २००० मध्ये
डिव्हिडंड - भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
रिटर्न्स - गेल्या १० वर्षांत ४ पटींपेक्षा अधिक
भविष्यात संधी - शेअरचा हळू हळू वाढतो. सुरक्षित आणि आश्वासक धीम्या गतीने परंतु सातत्याने वाढीव रिटर्न्स मिळाले आहेत आणि मिळत राहण्याची शक्यता अधिक.बोनस मिळण्याची संधी आहेच.
डिक्सोन टेक्नॉलिजी - इलेक्ट्रॉनिक डिजिटल डिझाईन आणि उत्पादन. व्यवसायात प्रामुख्याने एलइडी टीव्ही, एअर कंडिशन मशीन, वॉशिंग मशीन, स्मार्ट मोबाईल फोन, सेट टॉप बॉक्स, सीसी टीव्ही कॅमेरा यांचे डिझाईन आणि उत्पादन समाविष्ट आहे.
फेस व्हॅल्यू - रु २/- प्रति शेअर
सध्याचा भाव ; रु ४२७५/- प्रति शेअर
मार्केट कॅप - रुपये २५ हजार कोटी
भाव पातळी - वार्षिक हाय रु ६२४३/- आणि लो - ३१८०/-
बोनस शेअर्स - अद्याप नाही
शेअर स्प्लिट - १:५ मार्च २०२१ मध्ये
रिटर्न्स - शेअर सप्टेंबर २०१७ ला स्प्लिट झाला. तेव्हा पासून गेल्या पाच वर्षांत आठ पट रिटर्न्स दिले आहेत.
डिव्हिडंड - भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी - बोनस शेअर्स ची संधी आहे. एकदा शेअर स्प्लिट होऊ शकतो. व्यवसायातील प्रगती मुळे शेअचा भाव वाढण्याची शक्यता आहेच.
डिवीस लॅब - फार्मा उत्पादनांसाठी आवश्यक घटक उत्पादने बनविणारी कंपनी. याला प्रामुख्याने ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिअन्स असे म्हणतात.
फेस व्हॅल्यू - रुपये २/-
सध्याचा भाव ; रु ३५७१/-
मार्केट कॅप - ९४ हजार कोटी रुपये.
भाव पातळी - वार्षिक हाय रु ५४२५/- आणि लो - ३३६५/-
बोनस शेअर्स - २००९ आणि २०१५ या वर्षी दिले आहेत.
शेअर स्प्लिट - १:५ या प्रमाणात ऑगस्ट २००७ मध्ये
रिटर्न्स - गेल्या दहा वर्षांत सात पट रिटर्न्स दिले आहेत.
डिव्हिडंड - भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी - फार्मा क्षेत्रात कोर व्यवसाय असल्याने व्यवसायास उत्तम संधी. एकदा स्प्लिट आणि बोनस शेअर्स ची संधी आहेच.
D - गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे : दीपक नायट्रेट, दालमिया भारत, डॉ. लाल पॅथ लॅब या इतर कंपन्यांमधील दीर्घ कालीन गुंतवणूक उत्तम राहण्याची शक्यता आहे.
टीप : हे सदर गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.