मुंबई - SEBI ने शेअर्संच्या हेराफेरीसंदर्भात बॉलिवूड अभिनेता आर्शद वारसीवर कारवाई केली आहे. मार्केट रेग्युलरेटरने आर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गारोटी यांच्यावर शेअर बाजारात बिझनेस करण्यास म्हणजेच गुंतवणूक आणि ट्रेडींग करण्यास बंधन घातले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर्स खरेदी करण्याची सूचना देणाऱ्या भ्रामक व्हिडिओमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. SEBI ने यासंदर्भात कडक एक्शन घेतली.
आर्शदने शार्पलाइन आणि साधनाच्या शेअर्समध्ये पंप अँड डंप एक्टिविटीचा शोध घेतला. त्यामध्ये, यूट्यूब (You Tube) वर लहान गुंतवणूकदारांना गोंधळात टाकणारे प्रोमोशनल व्हिडिओ बनवून पंप अँ डंप केले जात होते. याद्वारे गुंतवणूकदारांना ५० कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाली.
SEBI ला या प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. साधना ब्रॉडकास्टच्या स्टॉक्सच्या किंमतीत हेराफेरी होत आहे. जे यूनिट्स हे काम करत आहेत, ते शेअर्संना काढूनही टाकत आहेत. याप्रकरणी तपास करताना सेबीने गुरुवारी अभिनेता आर्शद वापसी (Arshad Warsi), आणि त्याची पत्नी मारिया, साधना ब्रॉडकास्टचे प्रमोटर्स यांच्यसमवेत 44 यूनिट्सना सिक्युरिटी मार्केटमध्ये व्यापार करण्यास निर्बंध घातले आहेत.
भ्रामक यूट्यूब व्हिडिओ (You Tube Video) च्या माध्यमातून इन्वेस्टर्संना लालच दाखवण्यात येत आहे, याबाबत सेबीकडे तक्रार आली होती. SEBI ने गतवर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान याप्रकरणाचा तपास सुरु केला. त्यामध्ये, व्हिडियो शेअर केल्यानंतर साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्संमध्ये तेजी पाहायला मिळाली, त्यातून प्रमोटर्सने भरपूर पैसे कमावले.