Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक डील अन् रॉकेट बनला अदानी ग्रुपचा 'हा' खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड 

एक डील अन् रॉकेट बनला अदानी ग्रुपचा 'हा' खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड 

शुक्रवारी अदानी पॉवरने डीबी पॉवर (DB Power) सोबत 7017 कोटी रुपयांची डील केल्याची घोषणा केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:48 PM2022-08-22T15:48:58+5:302022-08-22T15:50:01+5:30

शुक्रवारी अदानी पॉवरने डीबी पॉवर (DB Power) सोबत 7017 कोटी रुपयांची डील केल्याची घोषणा केली आहे. 

Share Market adani power share surges up to 5 percent after the big deal with db power | एक डील अन् रॉकेट बनला अदानी ग्रुपचा 'हा' खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड 

एक डील अन् रॉकेट बनला अदानी ग्रुपचा 'हा' खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड 

अदानी ग्रुपच्या एका शेअरमध्ये आज जबरदस्त तेजी आहे. हा शेअर अदानी पॉवरचा (Adani Power) आहे. या शेअरमध्ये आज 4.66 टक्क्यांची तेजी दिसून आली असून तो आता 431.15 रुपयांवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, एका मोठ्या डीलनंतर या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली आहे. खरे तर, शुक्रवारी अदानी पॉवरने डीबी पॉवर (DB Power) सोबत 7017 कोटी रुपयांची डील केल्याची घोषणा केली आहे. 

काय आहे नेमकी डील? -
गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरने छत्तीसगडमधील डीबी पॉवरचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. ही डील 7,017 कोटी रुपयांची आहे. दोन्ही कंपन्यांमधील सामंजस्य कराराचा प्रारंभिक कालावधी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत असेल. मात्र, एकमेकांच्या सहमतीने तो वाढवलाही जाऊ शकतो. अदानी समूहाच्या कंपनीने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटल्यानुसार, "या अधिग्रहणामुळे कंपनीला छत्तीसगडमध्ये थर्मल पॉवरचा विस्तार करण्यास मदत होईल." मात्र अद्याप, या डीलला भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. 

अदानी पॉवरच्या शेअर्सचा जबरदस्त परतावा - 
अदानी पॉवरच्या शेअरने गोल्या एक वर्षात 485.80 टक्के एवढा परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर केवळ एका वर्षांत 73 रुपयांवरून 431 रुपयांवर पोहोचले आहेत. यावर्षी, या शेअरने YTD मध्ये तब्बल 325.62 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर, गेल्या एका महिन्यात या शेअरने 48.01 टक्के आणि गेल्या पाच बिझनेस डेजमध्ये 21टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share Market adani power share surges up to 5 percent after the big deal with db power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.