इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IRDEA) शेअरने आज गुरुवारी 1 फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठला. बीएसईवर हा शेअर 5% ने वधारून 190.95 रुपयांवर खुला झाला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. खरे तर, अर्थसंकल्पातील एका घोषनेमुळे या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली आहे. अर्थसंकल्प 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोलर स्कीम संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
सीतारामन म्हणाल्या, अर्थसंकल्पात 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफटॉप स्कीमच्या माध्यमाने मोफत वीज मिळेल. एवढेच नाही, तर या लोकांना दर महिन्याला 15 ते 18 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळेल. सितारामन म्हणाल्या, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
32 रुपयांवर आला होता IPO -
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी खुला झाला होता आणि 23 नोव्हेंबरपर्यंत ओपन होता. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 30-32 रुपये होता. कंपनीचा शेअर 29 नोव्हेंबर 2023 रोजी 50 रुपयांवर लिस्ट झाला होता. सध्याच्या किंमतीनुसार हा शेअर 281% टक्क्यांनी वधारला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप वाढून 48,823.25 कोटी रुपये झाले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)