Lokmat Money > बिझनेस न्यूज > 4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!

4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!

ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा एकदा निवडून येण्याची दाट शक्यता आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:07 PM2024-05-30T17:07:05+5:302024-05-30T17:09:00+5:30

ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा एकदा निवडून येण्याची दाट शक्यता आहे...

Share market After the lok sabha election 2024 results on June 4, this 50 share will become a rocket, experts say, will make reach | 4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!

4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!

आगामी 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे. याच बरोबर, देशाची धुरा पुढील पाच वर्षांसाठी कोण सांभाळणार हेही निश्चित होईल. यातच ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा एकदा निवडून येण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी करेक्शनवर स्टॉक खरेदी करण्यावर विचार करायला हवा. ब्रोकरेजच्या मते देशात मजबूत राजकीय स्थिरतेची शक्यता आहे. 

ब्रोकरेज फर्म काय म्हणते? -
ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे, "पुढील पाच वर्षांसाठी मोदींच्या नेतृत्वात एका स्थिर सरकारचा विचार करत, आम्ही मोठ्या घसरणीसह इक्विटी खरेदीचा सल्ला देत आहोत. आम्हाला बिगर NDA सरकार सत्तेवर येण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही."

कमी कालावधीसाठी  -
फिलिप कॅपिटल्सच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदार पुढील एक वर्षाचा विचार करता एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पीएफसी, आरईसी, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स, अल्ट्राटेक, सीमेन्स, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर, डिव्हीस लॅब्स, सिनजीन, एपीएल अपोलो, जिंदल एसएडब्ल्यू, आयजीएल, आरती इंडस्ट्रीज, विनती ऑर्गेनिक्स, प्राज, गोकलदास एक्सपोर्ट (एनआर) आणि एसपी अपॅरल (एनआर) शेअर खरेदी करू शकता.

दीर्घ कालावधीसाठी -
ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन ते तीन वर्षांसाठी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, सुंदरम फायनान्स (एनआर), एमएएस फायनॅन्शियल (एनआर), इन्फोसिस, एचसीएल टेक, पर्सिस्टेन्ट, केपीआयटी टेक, रेटगेन, रिलायन्स (एनआर), गेल, अंबुजा सिमेंट, जेके सिमेंट, एल अँड टी, भारती (एनआर), सन फार्मा, डिव्हीज लॅब्स, सिंजीन, कोल इंडिया (एनआर), जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टेनलेस, मारुती, भारत फोर्ज, अशोक लेलँड, कॉन्कोर, एनसीसी, पीएनसी इन्फ्रा, गेटवे डिस्ट्रिपार्क्स , एसआरएफ, आरती इंडस्ट्रीज, नवीन फ्लोरिन, पीआय इंडस्ट्रीज, कोरोमंडल आणि धानुका ॲग्रीटेक.

(टीप - येथे केवळ शेअर्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market After the lok sabha election 2024 results on June 4, this 50 share will become a rocket, experts say, will make reach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.