Join us  

'या' 2 केमिकल स्टॉक्सवर दिग्गज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, एकाच वर्षात बम्पर परतावा मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 2:58 PM

हे दोन असे मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत...

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशीष कचोलिया यांनी दोन केमिकल स्टॉकमध्ये आपली भागिदारी वाढवली आहे. हे दोन असे मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी विक्रीच्या वातावरणातही जबरदस्त परतावा दिला आहे. फाइनोटेक्स केमिकल आणि यशो इंडस्ट्रीज, अशी या स्टॉक्सची नावे आहेत.

एवढी वाढवली भागीदारी - आशिष कचोलिया यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फिनोटेक्स केमिकलमधील आपली भागीदारी 1.84 वरून 1.93 टक्के, तर यशो इंडस्ट्रीजमधील भागीदारी 2.55 टक्क्यांवरून 2.60 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

फिनोटेक्समध्ये भागीदारी - फिनोटेक्स केमिकल शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशीष कचोलिया यांची कंपनीतील भागीदारी 21,42,534 शेअर्स अथवा 1.93 टक्के एवढी आहे. यापूर्वी आशीष कचोलिया यांची कंपनीतील भागीदारी 20,42,534 शेअर्स, म्हणजेच 1.84 टक्के एवढी होती. यानुसार, कचोलिया यांची कंपनीतील भागीदारी 0.09 टक्क्यांनी वाढली आहे.

यशो इंडस्ट्रीजमध्ये भागीदारी -  यशो इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचे एकूण 2,96,322 शेअर्स अथवा 2.60 टक्के एवढा हिस्सा आहे. तर गेल्या, तिमाहीत त्यांच्याकडे कंपनीचे 2,91,231 शेअर्स अथवा 2.55 टक्के हिस्सा होता. 

वरील दोन्ही स्‍टोक्‍स हे मल्‍टीबॅगर शेअर्सपैकी एक आहेत. यशो इंडस्ट्रीजच्या समभागांनी गेल्या एका वर्षात 275 टक्के एवढा परतावा दिला आहे. तर फिनोटेक्स केमिकलने गेल्या एका वर्षात त्यांच्या भागधारकांना 115 टक्के परतावा दिला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक