गेल्या तीन दिवसांत अदानी ग्रुपच्या दोन स्टॉकवर बिगबूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचा 'स्टार हेल्थ' हा फेव्हरिट स्टॉक भारी पडला आहे. अदानी पावर आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सनी जेथे गेल्या 3 दिवसांत 19 टक्के एवढा परतावा दिला. तेथे याच 3 दिवसांत, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील स्टॉक स्टार हेल्थने 3 पट परतावा दिला आहे. गेल्या 3 दिवसांत स्टार हेल्थने 60.15 टक्के एवढी उसळी घेतली आहे.
गेल्या तीन दिवसांचा विचार करता, स्टार हेल्थ लार्ज कॅप आणि मिड कॅप कॅटेगिरीमध्ये टॉपवर आहे. हा स्टॉक बुधवारी 8.81 टक्क्यांची उसळी घेत, 762.30 रुपयांवर पोहोचला. तर अदानी ट्रान्समिशन बुधवारी किंचित वाढीसह 2996.10 रुपये आणि अदानी पॉवर 4.95 टक्क्यांची उसळी घेत 312.45 रुपयांवर बंद झाला. मार्केट कॅपचा विचार करता, अदानी पॉवरचे मार्केट कॅप 120510.06 कोटी रुपये एवढे आहे आणि अदानी ट्रान्समिशनचे 329514.10 कोटी रुपये आहे. तर, स्टॉर हेल्थचे मार्केट कॅप केवळ 43916.11 कोटी रुपये एवढे आहे.
अडानी पॉवर शेअर प्राइस हिस्ट्री -
एका आठवड्यात 7.78 टक्यांची वाढ
गेल्या एका महिन्यात 14.49 टक्के परतावा
गेल्या 3 महिन्यात 4.43 टक्के परतावा
गेल्या एका वर्षात 229.76 टक्क्यांची वाढ
3 वर्षांत 396.74 टक्क्यांची वाढ
5 वर्षांत 820.32 टक्के बंपर परतावा
अदानी ट्रांसमिशन शेअर प्राइस हिस्ट्री -
एका आठवड्यात 0.75 टक्के नुकसान
1 महिन्यात 39.97 टक्क्यांचा फायदा
3 महिन्यात 10.47 टक्क्यांची वाढ
1 वर्षात 232.49 टक्के एवढा तगडा परतावा.
3 वर्षांत अदानी ट्रान्समिशनने 1290.95 टक्के परतावा दिला आहे.
5 वर्षांत या स्टॉकने 2251.73 टक्क्यांची उसळी घेतली आहे.
स्टार हेल्थ शेअर प्राइस हिस्ट्री -
गेल्या एका आठवड्यात 11.5 टक्के उसळी घेतली
1 महिन्यात 48.01 टक्के वाढला
3 माहिन्यांत 11.33 टक्क्यांची वाढ