Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; सेन्सेक्स पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 04:14 PM2024-09-26T16:14:32+5:302024-09-26T16:17:48+5:30

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; सेन्सेक्स पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

share market closing 26th sep 2024 today again a new record sensex reached a record level of 85 930 | Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ

Share Market Closing 26th Sep, 2024 : जगभरातील अर्थव्यवस्था संकटातून जात असताना भारत यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. गुरुवारीही शेअर बाजाराने नवा विक्रम केला. BSE सेन्सेक्स ८६,००० आणि निफ्टी २६,३०० अंकांच्या जवळ पोहोचला. आठवड्याच्या चौथ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्सने ८५,९३०.४३ अंकांच्या ऐतिहासिक पातळी गाठली. तर निफ्टी ५० ने २६,२५०.९० अंकांची पातळी ओलांडली. शेवटी बीएसई सेन्सेक्स ६६६.२५ अंकांच्या वाढीसह ८५,८३६.१२ अंकांवर आणि निफ्टी ५० २११.९० अंकांच्या वाढीसह २६,२१६.०५ अंकांच्या नवीन विक्रमी पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वधारले
दोन दिवसांपूर्वी २४ सप्टेंबरला सेन्सेक्सने ऐतिहासिक ८५ हजारांचा टप्पा गाठला होता. तर आज ८६ हजाराच्या अगदी जवळ पोहचला. निफ्टी ५० ही यामध्ये मागे राहिला नाही. २४ सप्टेंबरला निफ्टी ५० ने २६ हजारची पातळी ओलांडली होती. आज २६,३०० वर पोहचला. सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वाढले तर अवघ्या ४ कंपन्यांचे शेअर्स घसरल्याचे पाहायला मिळाले. निफ्टी ५० मध्ये ५० पैकी ४१ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात तर ९ कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

सेन्सेक्सच्या या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीच्या शेअर्सने आज सर्वाधिक ४.५५ टक्के वाढ नोंदवली. याशिवाय टाटा मोटर्सचे शेअर्स २.८५ टक्के, बजाज फिनसर्व्हचे शेअर्स २.५८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स २.५३ टक्के, टाटा स्टीलचे शेअर्स २.२९ टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स २.११ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.०० टक्क्याच्या वाढीसह बंद झाले. बजाज फायनान्स, सन फार्मा, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक यांच्या शेअर्समध्येही १ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.

लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सर्वाधिक घसरले
सेन्सेक्ससाठी लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये ०.९४ टक्क्यांची सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली. याशिवाय एनटीपीसीचे शेअर्स ०.६६ टक्क्यांनी घसरून, इन्फोसिसचे शेअर्स ०.२१ टक्क्यांनी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.०१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Web Title: share market closing 26th sep 2024 today again a new record sensex reached a record level of 85 930

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.