Join us

मोठ्या तेजीनंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानी समूहाच्या 7 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:55 PM

Closing Bell Today: बीएसई सेंसेक्स 117 अंकांनी घसरुन 69536.56 वर बंद झाला तर निफ्टी 25.5 अंकांनी घसरुन 20912 वर बंद झाला.

Closing Bell Today: शेअर बाजारात गुरुवारी(दि.7) दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाला. कामकाजाअंती बीएसई सेन्सेक्स 117 अंकांनी घसरुन 69536.56 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 25.5 अंकांनी घसरुन 20912 च्या पातळीवर बंद झाला. आज शेअर बाजारातील सर्वाधिक लाभधारकांमध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि सिप्लाचे शेअर होते, तर नुकसान झालेल्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. 

गुरुवारी शेअर बाजाराच्या कामकाजातील चढउतारांदरम्यान बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये थोडी घसरण दिसून आली. मात्र, मल्टीबॅगर शेअर्स असलेल्या पटेल इंजिनीअरिंग, ओम इन्फ्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, देवयानी इंटरनॅशनल, जिओ फायनान्शियल, युनिपार्ट्स, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होती. तर, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कामधेनू लिमिटेड, गती लिमिटेड आणि स्टोव्ह क्राफ्टच्या शेअर्समध्ये थोडी घट पाहायला मिळाली.

गुरुवारी अदानी समूहाच्या 9 पैकी 7 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते, तर अदानी विल्मार आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये किंचित घट होती. गुरुवारी अदानी टोटल गॅसने 10 टक्क्यांच्या वाढीसह 1158 रुपयांची पातळी ओलांडली. तर, एसबीआय कार्ड, आयआरसीटीसी, पतंजली फूड्स, मुथूट फायनान्स, मारुती सुझुकी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. या उलट रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि अश्निषा इंडस्ट्रीज यांचे शेअर्स थोडे खाली घसरले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायअदानीगुंतवणूक