मुंबई : देशांतर्गत आणि जागतिक कारणांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार 491.28 अंकांनी कोसळला. बीएसई सेन्सेक्स 491 अंकांनी कोसळून 38,960.79 अंकांवर बंद झाला. NSE निफ्टीही 11672.15 अंकांवर बंद झाला. सलग चार सत्रांमध्ये शेअर बाजारात घसरण सुरु आहे. ऑईल आणि गॅस सेक्टर सोडून बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारचे पहिलेच लोकसभा अधिवेशन सुरु झाले आहे. याच दिवशी शेअर बाजार जवळपास 500 अंकानी कोसळला आहे. यामागे कमकुवत जागतिक धोरणे, अनिश्चितता तसेच पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी गुंतवणूकदार सावधता वाळगत आहेत. खासकरून गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यामध्ये निश्चिततेची कमी आणि बडे बडे व्यावसायिक दिवाळखोर झाल्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे.
याशिवाय मान्सूनची धीमी गतीही शेअर बाजार कोसळण्यामागचे मुख्य कारण आहे. हवामान विभागानुसार मान्सूनची गती 43 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे गुंतवणूकदारांची नजर मान्सूनच्या गतीवर आणि 20 जूनला होणाऱ्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीवर आहे.
निफ्टीमध्ये असलेल्या 50 कंपन्यांपैकी 46 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदविली गेली. केवळ 4 कंपन्याचे शेअरनी वाढ नोंदवली. या चार कंपन्यांमध्ये यर बँक, झील, कोल इंडिया आणि विप्रो सहभागी आहे. सर्वाधिक घसरण जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स आणि ओएनजीसीमध्ये झाली.