Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेप्सीसाठी काम करणारी कंपनी मालामाल; एका मिनिटात केली 27000 कोटींची कमाई

पेप्सीसाठी काम करणारी कंपनी मालामाल; एका मिनिटात केली 27000 कोटींची कमाई

कंपनीच्या शेअरमध्ये आज 200 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 03:32 PM2023-12-20T15:32:01+5:302023-12-20T15:32:23+5:30

कंपनीच्या शेअरमध्ये आज 200 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

share market, Company working for Pepsi Earned 27000 crores in one minute | पेप्सीसाठी काम करणारी कंपनी मालामाल; एका मिनिटात केली 27000 कोटींची कमाई

पेप्सीसाठी काम करणारी कंपनी मालामाल; एका मिनिटात केली 27000 कोटींची कमाई

Share Market: पेप्सीची सर्वात मोठी बॉटलर कंपनी वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या ​शेअर्समध्ये बंपर वाढ झाली. आज या शेअरने 18 टक्क्यांनी वाढ नोंदवून एका मिनिटात विक्रमी पातळी गाठली. यामुळे कंपनीला एका मिनिटात 27 हजार कोटी रुपयांहून अधिक नफा झाला. मंगळवारी बातमी आली होती की, वरुण बेव्हरेजेस लिमिटेड दक्षिण आफ्रिकेतील बेव्हको कंपनी आणि तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे अधिग्रहण करणार आहे. या बातमीचा कंपनीला फायदा झाला आणि बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. 

कंपनीच्या शेअर्समध्ये वादळी वाढ 
वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या शेअरमध्ये आज वादळी वाढ झाली. कंपनीचे शेअर्स सुमारे 200 रुपयांच्या वाढीसह 1350 रुपयांवर उघडले आणि एका मिनिटात 1380.45 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. कालच्या तुलनेत या शेअरमध्ये 18 टक्क्यांची वाढ झाली. मंगळवारी कंपनीचा शेअर 1172 रुपयांवर बंद झाला होता.

एका मिनिटात 27 हजार कोटींचा नफा
या वादळी वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये प्रचंड वाढ झाली. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,52,151.75 कोटी रुपये होते. आज कंपनीचा शेअर 1380.45 रुपयांवर पोहोचला आणि कंपनीचे मार्केट कॅप 1,79,213.22 कोटी रुपये झाले. याचा अर्थ कंपनीला एका मिनिटात 27,061.47 कोटी रुपयांचा नफा झाला.

(टीप:शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. लोकमत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)
 

Web Title: share market, Company working for Pepsi Earned 27000 crores in one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.