लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरातील सकारात्मक वातावरण, रिलायन्ससह अन्य महत्त्वाच्या कंपन्यांना गुंतवणूकदारांची असलेली मोठी मागणी यामुळे सोमवारी प्रारंभी चलनवाढ झाल्यामुळे बाजारात झालेली घसरण मागे पडून शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उंची गाठली आहे.
शेअर बाजाराचा प्रारंभ घसरणीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५८, तर निफ्टी ३९ अंशांनी खाली आला होता. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक सुमारे ३५० अंश खाली गेला. मात्र, त्यानंतर बाजारामध्ये गुंतवणूकदार सक्रिय झाले. रिलायन्ससह अन्य महत्त्वाच्या समभागांना मोठी मागणी असल्यामुळे बाजारामध्ये वाढ होत गेली. सोमवारचे कामकाज संपताना संवेदनशील निर्देशांक ७६.७७ अंशांची वाढ नोंदवित ५२,५५१.५३ असा बंद झाला. सेन्सेक्सचा हा नवीन उच्चांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही १२.५० अंशांनी वाढून १५,८११.८५ असा उच्चांकी बंद
झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही नवीन उच्चांक गाठला आहे.
गुंतवणूकदार सक्रिय
फेडरल रिझर्व्हची बैठक १५ व
१६ रोजी होणार असून, त्यामध्ये व्याजदर तसेच प्रोत्साहन कायम ठेवले जाण्याचा अंदाज असल्याने गुंतवणूकदार खुशीमध्ये आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असलेली दिसून
आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची मोठी वाढ झाली. त्याचप्रमाणे बँका, औषध कंपन्या यांनाही चांगली मागणी असलेली दिसून आली.
रेलिगेअरच्या
माजी प्रवर्तकाचा जामीन रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बँक घोटाळ्यातील आरोपी असलेले रेलिगेअर एंटरप्रायजेसचे माजी प्रवर्तक शिवेंदर मोहन सिंग यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला.
रेलिगेअर फिन्व्हेस्ट लिमिटेड (आरएफएल) या कंपनीच्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप सिंग यांच्यावर असून, त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. सुरेशकुमार काईट यांनी त्यांचा जामीन रद्द केला. त्यांनी रचलेल्या षडयंत्राचा शोध घेणे आणि अपहार केलेला पैसा हुडकून काढणे यासाठी सिंग यांचे कोठडीत राहणे आवश्यक आहे,
असे प्रतिपादन फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आले. ते न्यायालयाने मान्य केले आहे.
३ मार्च २०२१ रोजी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामिनास दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
दरम्यान, या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाले आहे का, याचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) स्वतंत्रपणे केला जात आहे, त्याचीही चौकशी वेगळी सुरूच
आहे.