Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराला पाडलं भगदाड! ५० दिवसात १.१६ लाख कोटी रुपये काढले

'या' गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराला पाडलं भगदाड! ५० दिवसात १.१६ लाख कोटी रुपये काढले

Share Market Crash : विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून २२,४२० कोटी रुपये काढले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन कधी थांबणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:41 PM2024-11-17T15:41:59+5:302024-11-17T15:42:37+5:30

Share Market Crash : विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून २२,४२० कोटी रुपये काढले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन कधी थांबणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

share market crash rs 22420 crore vanishes from indian markets why foreign investors withdraw money | 'या' गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराला पाडलं भगदाड! ५० दिवसात १.१६ लाख कोटी रुपये काढले

'या' गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराला पाडलं भगदाड! ५० दिवसात १.१६ लाख कोटी रुपये काढले

Share Market Crash : भारतीय शेअर बाजाराचे सध्या 'बुरे दिन' चालू आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, सप्टेंबरमध्ये ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहचलेला बाजार सध्या निच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भारतीय शेअर बाजाराला हा धक्का विदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) दिला आहे. FPI ने अद्याप त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल केलेला दिसत नाही. FPI सातत्याने भारतीय शेअर्समधून पैसे काढत आहे. वास्तविक, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीन सरकारने दिलेल्या विशेष पॅकेजमुळे विदेशी गुंतवणूकदार तिकडे पळत आहेत. दुसरीकडे, भारतीय शेअर बाजाराचे मूल्यांकन वाढले आहे, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदार उच्च मूल्यांकनावर पैसे गुंतवण्यास तयार नाहीत, यामुळे ते नफा बुक करत आहेत.

दुसरीकडे, ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरच्या इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम अमेरिकन उत्पन्नावर दिसून येत आहे. विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून अमेरिकन रोख्यांकडे जात आहेत. यामुळेच गेल्या ५० दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून १ लाख कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे.

शेअर बाजारात FPI मुळे खळबळ
देशांतर्गत शेअर बाजारातील उच्च मूल्यांकन, चीन सरकारचे आर्थिक पॅकेज आणि अमेरिकन डॉलरसह ट्रेझरी उत्पन्नात झालेली वाढ, यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून २२,४२० कोटी रुपये काढून घेतले आहेत. या विक्रीनंतर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण १५,८२७ कोटी रुपये काढले आहेत. आकडेवारीनुसार, या महिन्यात आतापर्यंत FPI ने २२,४२० कोटी रुपये काढले आहेत. ऑक्टोबरमध्ये ९४,०१७ कोटी रुपये काढले, कुठल्याही महिन्यात ही सर्वाधिक वाईट अवस्था आहे. यापूर्वी, मार्च २०२० मध्ये, एफपीआयने इक्विटीमधून ६१,९७३ कोटी रुपये काढले होते.

सप्टेंबर २०२४ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ५७,७२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी ९ महिन्यांतील सर्वोच्च पातळी होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील पैसे काढण्याचा आत्तापर्यंत समावेश केला तर, विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ५० दिवसांत शेअर बाजारातून सुमारे १,१६,४३७ कोटी रुपये काढले आहेत. दुसरीकडे, FPI ने समीक्षाधीन कालावधीत डेट जनरल लिमिटमध्ये ४२ कोटी रुपये आणि व्हिआरआरमध्ये ३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या वर्षात आतापर्यंत एफपीआयने कर्ज बाजारात १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही.के.विजयकुमार म्हणाले की, ऑक्टोबरपासून एफपीआयची सतत विक्री ३ घटकांच्या एकत्रित परिणामामुळे झाली आहे. या घटकांमध्ये भारतातील उच्च मूल्यांकन, घटत्या कमाईबद्दलची चिंता आणि अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय यांचा समावेश आहे.

Web Title: share market crash rs 22420 crore vanishes from indian markets why foreign investors withdraw money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.