Share Market LIVE Blog in Hindi | BSE Sensex, Nifty50: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी जागतिक शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली. सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक १२६६.२० अंकांनी घसरून ५५७४५.५४ अंकांवर आला.
कामकाजादरम्यान रिलायन्स, व्होडाफओन आयडिया, पेटीएम, फ्युचर रिटेल, झोमॅटो आणि विप्रोसारख्या स्टॉक्सवर फोकस राहणार आहे. आजच दक्षिण भारतातील रियल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचंही लिस्टिंग झालं आहे. कंपनीचा आयपीओय़ ४.६० पट सबस्क्राईब झाला होता.
आज गुंतवणूकदारांकडे एपीआय (अॅक्टिल फार्मास्युटिकल्स इनग्रेडिअंट्स) तयार करणारी दिग्गज कंपनी सुप्रिया लाइफ सायन्सच्या ७०० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अखेरची संधी आहे. हा आयपीओ आतापर्यंत ५.६९ पट सबस्क्राईब झालाय. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित हिस्सा आतापर्यंत २५.३८ पट सबस्क्राईब झाला आहे. आशियाई बाजारातही घसरणीचं सत्र सुरूच आहे. तर अमेरिकन मार्केटबद्दल सांगायचं झालं तर १७ डिसेंबरला नास्डाक ०.०७ टक्के म्हणजेच १०.७६ अंकांच्या घसरणीनंतर १५१६९.६८ अंकांवर बंद झाला. तर युरोपियन बाजारात १७ डिसेंबर रोजी संमिश्र चित्र पाहायला मिळालं.