Join us

Share Market Holidays : पुढच्या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार राहणार बंद, पाहा कधी होणार नाही काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 4:36 PM

Share Market Holidays : पुढील आठवड्यात शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. जाणून घेऊ कोणत्या आहेत या तारखा.

होळीचा सण (Holi 2024) आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत शेअर बाजार कोणत्या दिवशी बंद राहणार हा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असेल. पुढील आठवड्यात शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. धुलिवंदन आणि गुड फ्रायडेच्या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. जाणून घेऊ कोणत्या आहेत या तारखा. 

बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२४ रोजी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. त्याच वेळी, शेअर बाजार शुक्रवार, २९मार्च २०२४ रोजीही बंद राहतील. ग्रज फ्रायडेमुळे या दिवशी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. 

अशा स्थितीत पुढील आठवड्यात ५ दिवसांऐवजी फक्त ३ दिवस शेअर बाजारात व्यवहार होणार आहेत. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी शेअर बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार होतील. 

एप्रिलमध्ये कधी सुट्ट्या? 

गुड फ्रायडेमुळे चालू आर्थिक वर्षातील शेवटची सुट्टी शुक्रवारी असेल. एप्रिल बद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात देखील शेअर बाजाराचं कामकाज २ दिवसांसाठी बंद राहिल. ११ आणि १७ एप्रिल रोजी शेअर बाजार बंद राहतील. ईदनिमित्त ११ एप्रिल रोजी शेअर बाजाराला सुट्टी असेल. त्याच वेळी, १७ एप्रिल रोजी रामनवमीमुळे शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. 

शुक्रवारी शेअर बाजाराची स्थिती काय? 

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण झाल्यानंतर बाजारानं शानदार रिकव्हरी नोंदवली. या कालावधीत बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १९०.७५ अंकांनी किंवा ०.२६ टक्क्यांनी वाढून ७२,८३१.९४ अंकांवर बंद झाला. एनएसई निफ्टी देखील ८४.८० अंकांनी किंवा ०.३९ टक्क्यांनी वाढून २२,०९६.७५ अंकांवर बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारहोळी 2024शेअर बाजार