Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2 रुपयांच्या शेअरनं केली कमाल, लाख रुपये लवणाऱ्यांना केलं मालामाल, झाले करोडपती!

2 रुपयांच्या शेअरनं केली कमाल, लाख रुपये लवणाऱ्यांना केलं मालामाल, झाले करोडपती!

या शेअर्सनी 10 वर्षांही कमी काळात तब्बल 13,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:08 PM2022-02-26T18:08:47+5:302022-02-26T18:09:14+5:30

या शेअर्सनी 10 वर्षांही कमी काळात तब्बल 13,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे....

share market Indo count industries delivered huge return | 2 रुपयांच्या शेअरनं केली कमाल, लाख रुपये लवणाऱ्यांना केलं मालामाल, झाले करोडपती!

2 रुपयांच्या शेअरनं केली कमाल, लाख रुपये लवणाऱ्यांना केलं मालामाल, झाले करोडपती!

चांगला परतावा देण्याच्या बाबतीत पेनी स्टॉक्सचे रेकॉर्ड जबरदस्त आहे. असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांत केवळ लाख रुपये गुंतवलेल्या लोकांना कोट्यवधींचा फायदा झाला आहे. असाच एक पेनी स्टॉक आहे इंडो काउंट इंडस्ट्रीज (Indo Count Industries). एक वेळ हा शेअर 2 रुपयांपेक्षाही कमीचा होता आणि आता तो 170 रुपयांच्याही पुढे गेला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी 10 वर्षांही कमी काळात तब्बल 13,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

1 लाख रुपयांचे झाले 1.3 कोटी रुपये -
इंडो काउंट इंडस्ट्रीजचा शेअर 16 मार्च 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 1.26 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर 25 फब्रुवारी 2022 रोजी बीएसईमध्ये 174.50 रुपयांना बंद झाले होते. कंपनीच्या शेअर्सनी 10 वर्षांपेक्षा कमीच्या गुंतवणूकदारांना 13,800 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. जर एखाद्या वक्यतीने 16 मार्च 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले असते आणि ते तसेच ठेवले असते, तर ती रक्कम आता 1.38 कोटींच्या जवळपास पोहोचली असती. 

2 वर्षांत किमान 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा - 
इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर 8 मे 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 24.40 रुपयांवर ट्रेंड करत होते. कंपनीचे शेअर 25 फब्रुवारी 2022 ला बीएसईमध्ये 174.50 रुपयांवर बंद झाले. 2 वर्षांत या शेअर्समध्ये इनव्हेस्टर्सला किमान 715 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न मिळाले आहेत. अर्थात, एखाद्या व्यक्तीने 8 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती तशीच ठेवली असती तर आजपर्यंत ही रक्कम 7.15 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचली असती.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: share market Indo count industries delivered huge return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.