Join us

सारांश: तरुणांनो, पडा शेअर बाजारात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:20 AM

कोरोना काळात आणि त्या पश्चात भारतीय तरुण शेअर मार्केट कडे आकर्षित झालेले आहेत.

कोरोना काळात आणि त्या पश्चात भारतीय तरुण शेअर मार्केट कडे आकर्षित झालेले आहेत. वाढलेल्या डिमॅट अकाउंटच्या संख्येवरून हे सिद्ध झाले आहे. बाजाराने कोरोना पश्चात एकतर्फी बुल रन दाखविली आणि नंतर आता गेल्या चार महिन्यांपासून बेअर ने बाजारावरील पकड दाखवून दिली. बाजारातील चढ उतार आणि अनिश्चितता ही तरुणाई अनुभवत आहे. काहींच्या मनात संभ्रम तर काहींच्या मनात भीती अशी अवस्था सध्या असणार हे निश्चित.

असे पाहा बाजाराकडे...

शेअरमार्केट हे झटपट पैसे कमविण्याचे साधन असे न पाहता दीर्घ कालीन गुंतवणुकीची साधन असेच पाहावे.

बाजारात उतरताना त्यात चढ उतार असणार हे मनास पटवून द्यावे.

कमी किमतीचे शेअर चांगले हे मनातून काढून टाकावे.

बाजाराचे टेक्निकल आणि फंडामेंटल समजून घ्यावे.

राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय घटना आणि घडामोडी,  रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर घटविले आणि वाढविले जाणे यांचा बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो याचा अभ्यास करावा. उदा. रशिया - युक्रेन युद्ध आणि त्यामुळे ब्रेंट ऑइल मधील भाव वाढ. यामुळे होणारे इन्फ्लेशन आणि त्याचा बाजारावर होणारा नकारात्मक परिणाम हे आपण पहिलेच आहे.

जितकी रक्कम नजीकच्या काळात लागणार नाही आणि दीर्घ काळापर्यंत ठेऊ शकतो तितकीच रक्कम गुंतवावी. 

आपल्याला ज्या क्षेत्रांतील जाण आहे आणि थोडेफार कळते अश्या क्षेत्रांतील कंपन्यांचे शेअर्स निवडावे. 

गुंतवणुकीपूर्वी निवडलेल्या कंपन्यांचे फंडामेंटल्स आवर्जून पहा. यात किमान गेल्या तीन वर्षातील कंपनीची उलाढाल, नफा, मार्जिन हे महत्वाचे. तसेच शेअरहोल्डिंग पॅटर्न यात प्रोमोटर स्टेक, विदेशी - भारतीय गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्समधील हिस्सा, इंश्युरन्स कंपन्यांकडील हिस्सेदारी, रिटेल गुंतवणूकदार हिस्सा असे मागील तीन वर्षांचे पाहावे. प्रमोटर्सने त्यांचे शेअर्स प्लेज ठेवले आहेत का आणि त्याचे प्रमाण किती हे सुद्धा पाहावे.

शेअर खरेदीवेळी टेक्निकल अभ्यास करून चार्ट पॅटर्न पाहावा. एमएसीडी आणि आरएसआय यावरून नजीकच्या कालावधीत भाव वरच्या दिशेला की खालच्या जाऊ शकतो हे कळते. यावरून त्वरित घ्यावा की थोडे थांबावे याचे आकलन होते. डेली चार्टवरून त्याची सपोर्ट व रेझिस्टन्स लेव्हल जाणून घेता येते. 

शेअर बाजार हा सट्टा नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठी संपत्ती निर्माण करू शकणारे साधन आहे. इंट्रा डे आणि ऑप्शन या ट्रेडमध्ये न पडता गुंतवणूकदार म्हणून राहा आणि त्याच नजरेने बाजाराकडे पहा. बाजार हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्यात उतरण्यापूर्वी थिअरॉटिकल ज्ञान शिका. जितके शिकाल तितके कमीच असते. बाजारात जेव्हा आपण उतरतो तेव्हा त्यातील अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जात असतो.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक