पुष्कर कुलकर्णी
pushkar.kulkarni@lokmat.com
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी बाजारात अजिबात गुंतवणूक करू नये. आज गुंतविले आणि दुसऱ्या महिन्यात दुप्पट झाले असे काहींच्या बाबतीत झालेही असेल; परंतु, सगळ्यांच्याच बाबतीत असे होतेच असे नाही. ज्या कंपन्यांवर आपला विश्वास आणि भरोसा आहे अशाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि त्यावर विश्वास ठेवा. संपत्ती वाढेल हे मात्र निश्चित. आज इंग्रजी अक्षर ‘एफ’पासून सुरू होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी...
फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लि. (FINO)
केमिकल क्षेत्रातील एक चांगली कंपनी. प्रक्रिया फूड उत्पादनात वापरले जाणारे घटक पदार्थ ज्यात अँटी फंगल ॲडिटिव्ह, ल्युब्रिकंट, फ्लो इंप्रुव्हर, अँटी फॉगिंग ॲडिटिव्ह इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे.
फेस व्हॅल्यू : रु. ५/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. ५,९७७/- प्रतिशेअर (सध्या करेक्शन मोडमध्ये आहे)
मार्केट कॅप : रुपये २० हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रुपये ७,३२८/- आणि लो-रुपये ३,१५५/-
बोनस शेअर्स : अद्याप नाही.
शेअर स्प्लिट : अद्याप नाही.
रिटर्न्स : जुलै २०१८ मध्ये शेअर लिस्ट झाला. तेव्हापासून तब्बल सातपट रिटर्न्स दिले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : अत्यंत महत्त्वाच्या व्यवसायास अतिआवश्यक घटक उत्पादनांची निर्मिती असल्याने या कंपनीस अत्यंत उत्तम भविष्य असेल. बोनस शेअर्स आणि स्प्लिटची संधी आहेच.
फोर्टिस हेल्थकेअर लि. (FOHE)
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची आणि डायग्नोसिस सेंटर्सची भारतात चेन असणारी हेल्थकेअर क्षेत्रातील कंपनी. हॉस्पिटल्स चेनमध्ये विशेष आजारांवर उपचार केले जातात.
फेस व्हॅल्यू : रुपये १०/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रुपये २८२/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रुपये २० हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रुपये ३२५/- आणि
लो - रुपये २१९ /-
बोनस शेअर्स : अद्याप बोनस शेअर दिले नाहीत.
शेअर स्प्लिट : अद्याप नाही.
डिव्हिडंड : नाही.
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत दुपटीपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
भविष्यात संधी : आरोग्य आणि उपचार याचे महत्त्व जाणता हा व्यवसायास कधीही बंद पडणारा नाही. यामुळे भविष्यात त्यादृष्टीने व्यवसायवाढ होऊ शकते. शेअर स्प्लिट आणि बोनसची संधी आहेच.
फेडरल बँक (FED)
रिटेल बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रेझरी ऑपेरेशन्स मधील बँक. भारतात या बँकेच्या
१,२७२ शाखा आहेत.
फेस व्हॅल्यू : रुपये २/-
सध्याचा भाव : रु. १३६/- (वार्षिक उच्चतम पातळीवर आहे)
मार्केट कॅप : २८ हजार कोटी रुपये.
भाव पातळी : वार्षिक हाय रुपये १३९/- आणि
लो - रुपये ७८/-
बोनस शेअर्स : सन २००४ आणि २०१५ मध्ये असे दोनवेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिट : ऑक्टोबर २०१३ मध्ये १:५ या प्रमाणात स्प्लिट केले आहेत.
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत अडीच पट रिटर्न्स मिळालेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : बँकिंग क्षेत्र कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. बुडीत कर्जावर व्यवस्थित नियंत्रण ठेवल्यास बँकेस उज्ज्वल भविष्य निश्चित असते. त्यामुळे या बँकेचे शेअर्स खरेदी केल्यावर बुडीत कर्जाचे प्रमाण नेमके किती यावर प्रत्येक वर्षी लक्ष ठेवावे.
F गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे : इतर कोणत्याही कंपन्या सुचवाव्या अशा नाहीत.
टीप : हे सदर गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.
पुढील भागात ‘जी’ या अक्षराने सुरू होणाऱ्या कंपन्यांविषयी...