Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Investment: पैसाच पैसा! १ लाखाचे झाले तब्बल ६ कोटी; गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न, अजूनही संधी आहे का?

Share Market Investment: पैसाच पैसा! १ लाखाचे झाले तब्बल ६ कोटी; गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न, अजूनही संधी आहे का?

Share Market Investment: एका बाजूला शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असताना, या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश केल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 08:05 PM2023-02-07T20:05:00+5:302023-02-07T20:06:09+5:30

Share Market Investment: एका बाजूला शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असताना, या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश केल्याचे सांगितले जात आहे.

share market investment tips those who invested rs 1 lakh in kpr mill multibagger stock got return of 6 Crore | Share Market Investment: पैसाच पैसा! १ लाखाचे झाले तब्बल ६ कोटी; गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न, अजूनही संधी आहे का?

Share Market Investment: पैसाच पैसा! १ लाखाचे झाले तब्बल ६ कोटी; गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न, अजूनही संधी आहे का?

Share Market Investment: शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर कोसळला. या अहवालाचा केवळ अदानी समूहावर नाही, तर संपूर्ण शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. मात्र, यातच काही कंपन्यांची वाटचाल दमदार पद्धतीने सुरू राहिली. शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत, ज्यांची गणना मल्टिबॅगर स्टॉक कंपन्यांच्या यादीत केली जाते. या कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवत छप्परफाड रिटर्न दिले आहे. 

गुंतवणूकदारांना कोट्यधीश करणारा हा स्टॉक केपीआर मिल्सचा आहे. गारमेंट्स क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ११ वर्षांपूर्वी मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते. ही गुंतवणूक आजच्या घडीलाही कायम असती, तर याची किंमत ६ कोटींहून अधिक झाली असती. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे स्टॉक दीर्घकाळासाठी ठेवले होते त्यांना मोठा परतावा मिळाला आहे.

केपीआर मिल्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल

केपीआर मिल्स लिमिटेडचे शेअर्स ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ८.८५ रुपयांवर व्यवहार करत होते. या कालावधीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने केपीआर मिल्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याला सुमारे ११ हजार ३०० शेअर्स मिळाले असते. केपीआर मिल्स नोव्हेंबर २०१६ मध्ये १:२ आणि सप्टेंबर २०१२ मध्ये १:५ या प्रमाणात शेअर्स विभागले. एखाद्या गुंतवणूकदाराने २०१२ मध्ये केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्याच्याकडे सध्या एकूण ११३००० शेअर्स असते. केपीआर मिल्सचे शेअर्स आताच्या घडीला ५३९ रुपयांवर व्यवहार करत आहेत. यामुळे गुंतवणूक केलेल्या १ लाख रुपयांची किंमत आता ६ कोटींच्या घरात गेली असती, असे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: share market investment tips those who invested rs 1 lakh in kpr mill multibagger stock got return of 6 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.