Sensex Nifty Today: इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. सोमवारी आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी, देशांतर्गत शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची जोरदार घसरण दिसून आली. निफ्टी १९५५० अंकांवर खुला झाला. तर सेन्सेक्स ४५१.९ अंक म्हणजेच ०.६८ अंकांच्या घसरणीसह ६५,५२५.६५ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी १४८.१० अंक म्हणजेच ०.७५ अंकांच्या घसरणीसह १९५०५.४० अंकांवर व्यवहार करत होता.प्री-ओपनिंग बाजारातही घसरण दिसून आली होती. ९.०२ च्या आसपास सेन्सेक्स ७०२.८६ अंक म्हणजेच १.०७ अंकांच्या घसरणीसह ६५,२९१.३५ अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ९३.६५ अंक म्हणजेच ०.४८ अंकांच्या घसरणीसह १९५५८.७० अंकांवर व्यवहार करत होता.कामकाजाच्या सुरुवातीला बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टायटन आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर रामको सिमेंट, स्कॅफलर इंडिया आणि ओरियंट इलेक्ट्रीक, अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
कच्च्या तेलाच्या किंमतीवरही परिणामयुद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही दिसून येत आहे. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कच्च्या तेलाच्या किंमतीत ४ टक्क्यांची तेजी दिसत होती. ब्रेंट क्रूड ३.६५ टक्क्यांच्या उसळीसह ८७.६७ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचलं. तर डब्ल्यूटआय ८६.०५ डॉलर्स प्रति बॅरलवर होते.