Lokmat Money > बिझनेस न्यूज > याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल

याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या शेअरने मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या उसळीसह 203.95 रुपयांची पातळी गाठली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 03:14 PM2022-11-30T15:14:50+5:302022-11-30T15:17:24+5:30

कंपनीच्या शेअरने मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या उसळीसह 203.95 रुपयांची पातळी गाठली.

Share Market jk tryre and industries stock jumps double in last five months | याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल

याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल

टायर बनवणारी दिग्गज कंपनी JK टायरच्या (JK Tryre & Industries) शेअर्सनी सध्या रॉकेट स्पीड घेतला आहे. या शेअरच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ दिसून आली आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. महत्वाचे म्हणजे, जेके टायरच्‍या शेअरच्‍या किमतीत गेल्या 5 महिन्‍यांमध्‍ये दुप्पट वाढ झाली आहे.

कंपनीच्या शेअरने मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या उसळीसह 203.95 रुपयांची पातळी गाठली. गेल्या दोन दिवसांत जेके टायरच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच, ज्या व्यक्तीने 3 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांना 50 टक्क्यांचा परतावा मिळाला असेल.

जेके टायरच्या शेअरची किंमत जून 2022 मध्ये 52 आठवड्यांतील लो लेव्हल 96.40 रुपयांवर होती. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 112 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. तसेच, आज कंपनीचा शेअर सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.43 टक्क्यांच्या उसळीसह 196.70 रुपयांवर ट्रेड करत होता.

जेके टायर ही डॉ आ पी सिंघानिया यांच्या नेतृत्वाखालील जेके ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या टायर उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. एवढेच नाही, तर जेके टायरचा जगातील 25 सर्वात मोठ्या टायर उत्पादक कंपन्यांच्या यादीत समावेश आहे. ही कंपनी ट्रक, बस, ट्रॅक्टर, कार आणि दुचाकीसाठी टायर बनवते.
 

Web Title: Share Market jk tryre and industries stock jumps double in last five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.