Lokmat Money > बिझनेस न्यूज > 755 रुपयांवर पोहोचू शकतो हा शेअर, एक्सपर्ट म्हणतायत लवकरच मिळणार छप्परफाड नफा!

755 रुपयांवर पोहोचू शकतो हा शेअर, एक्सपर्ट म्हणतायत लवकरच मिळणार छप्परफाड नफा!

ब्रोकरेज प्रभुदास लिलाधर यांच्यामते JSW Steel च्या शेअरची किंमत मेडियम टर्ममध्ये 755 रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे 10 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 07:06 PM2023-03-03T19:06:37+5:302023-03-03T19:07:24+5:30

ब्रोकरेज प्रभुदास लिलाधर यांच्यामते JSW Steel च्या शेअरची किंमत मेडियम टर्ममध्ये 755 रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे 10 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते.

Share market jsw stock can reach 755 rupees, experts say that you will soon get a huge profit | 755 रुपयांवर पोहोचू शकतो हा शेअर, एक्सपर्ट म्हणतायत लवकरच मिळणार छप्परफाड नफा!

755 रुपयांवर पोहोचू शकतो हा शेअर, एक्सपर्ट म्हणतायत लवकरच मिळणार छप्परफाड नफा!

शेअर बाजारातील लिस्टेड दिग्गज पोलाद कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलच्या स्टॉकवर तज्ज्ञांनी मोठा विश्वास दर्शवला आहे. YTD नुसार JSW स्टीलचा शेअर 12 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत या शेअरची किंमत 700 रुपयांच्याही वर जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा शेअर सध्या बीएसईवर 682.95 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत या शेअरमध्ये 1.21 टक्क्यांची तेजी दिसत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हा शेअर 789.95 रुपयांवर पोहोचला होता. ही 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी आहे.

काय म्हणताय एक्सपर्ट? -
ब्रोकरेज प्रभुदास लिलाधर यांच्यामते JSW Steel च्या शेअरची किंमत मेडियम टर्ममध्ये 755 रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे 10 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, JSW Steel च्या शेअर प्राइस आऊटलुकसंदर्भात बोलताना प्रभुदास लिलाधरच्या वैशाली पारेख यांनी म्हटले आहे की, शेअरच्या किंमतीत मोठी खसरण दिसून आली आहे. आम्ही या स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दोतो. हा शेअर 650 रुपयांच्या सर्पोटिंग लेव्हलवर कायम ठेवत, 755 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले जाते.

JSW स्टील ही कंपनी नुकतीच, आशियन कलर कोटेड स्टील लिमिटेड आणि हसोद स्टील लिमिटेडच्या मर्जरच्या योजनेसाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) कडून अनुमोदन मिळाल्याने चर्चेत होते. JSW स्टीलचे जानेवारी महिन्यातील कच्च्या स्टीलचे उत्पादन 15 टक्क्यांनी वाढून 18.91 लाख टनवर पोहोचले होते. जानेवारी 2022 मध्ये कंपनीचे उत्पादन 16.46 लाख टन होते. जानेवारी, 2023 मध्ये कंपनीची क्षमता 99 टक्के होती. जी जानेवारी 2022 मध्ये 96 टक्के होती.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Share market jsw stock can reach 755 rupees, experts say that you will soon get a huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.