Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' कंपनीला अनेक क्षेत्रांतून मिळाली 1,092 कोटींची नवी ऑर्डर, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड

'या' कंपनीला अनेक क्षेत्रांतून मिळाली 1,092 कोटींची नवी ऑर्डर, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड

KEC International share price: कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:13 PM2022-06-21T17:13:52+5:302022-06-21T17:14:50+5:30

KEC International share price: कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.

share market kec international share surges 5 percent after winning orders worth 1092 crore rupees | 'या' कंपनीला अनेक क्षेत्रांतून मिळाली 1,092 कोटींची नवी ऑर्डर, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड

'या' कंपनीला अनेक क्षेत्रांतून मिळाली 1,092 कोटींची नवी ऑर्डर, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड

 
केईसी इंटरनॅशनलच्या शेअरने आज सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान 5 टक्यांपर्यंत उसळी घेतली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी बघायला मिळत आहे. इंड्रा डेमध्ये केईसी इंटरनॅशनलचे शेअर BSE वर 2.24 टक्यांच्या तेजीसह 370 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.

1,092 कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर - 
कंपनीला विविध व्यवसायांमध्ये सुमारे 1,092 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. KEC इंटरनॅशनलच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन (T&D) व्यवसायाने T&D प्रकल्पांसाठी भारत, मध्य पूर्व आणि यूएसमधील ऑर्डर मिळवल्या आहेत. रेल्वे व्यवसायाने भारतात 2 x25kV ओव्हरहेड विद्युतीकरण (ओएचई) आणि स्पीड अपग्रेडेशनशी (मिशन रफ्तार) संबंधित कामांसाठी एक ऑर्डर मिळवली आहे. नागरी व्यवसायने भारतातील निवासी, औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रातील ऑर्डर मिळवल्या आहेत. तर, केबल व्यवसायाने भारत आणि परदेशात विविध प्रकारच्या केबल्ससाठी ऑर्डर मिळवली आहे.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती -
केईसी इंटरनॅशनलचा शेअर सकाळी 9.21 वाजता बीएसईवर 373.45 रुपयांवर पोहोचला होता. तो 11.55 रुपये अथवा 3.19 टक्क्यांवर ट्रेड होत होता. या शेअरने 26 ऑक्टोबर, 2021 आणि 12 मे, 2022 ला अनुक्रमे 52-आठवड्यांतील हाय  550.00 रुपये आणि 52-आठवड्यातील खालच्या पातळीवर 345.15 रुपयांवर पोहोचला होता. हा शेअर आता आपल्या 52-आठवड्यांतील हाय लेव्हलपेक्षा 32.1 टक्के खालच्या आणि आपल्या 52 आठवड्यांतील खालच्या पातळीपेक्षा 8.2 टक्कयांवर ट्रेड होत आहे.

Web Title: share market kec international share surges 5 percent after winning orders worth 1092 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.