Join us

बम्पर परतावा... छोट्या कंपनीची मोठी कमाल! 2 वर्षांतच 1 लाखाचे केले 29 लाख! दिग्गजांनी लावलाय पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 4:50 PM

या कंपनीत आशीष कचौलिया आणि सुनील सिंघानिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनीही पैसे गुंतवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चाकं 1450 रुपये एवढा आहे.

शिपिंग इंडस्ट्रीशी संबंधित एक छोटी कंपनी असलेल्या नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सने गेल्या 2 वर्षांत जबरदस्तस परतावा दिला आहे. नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सचे शेअर गेल्या 2 वर्षांत 37 रुपयांनी वाढून 1000 रुपयांवर पोहोचले आहेत. मल्टीबॅगर कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षांत 2800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कंपनीत आशीष कचौलिया आणि सुनील सिंघानिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनीही पैसे गुंतवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चाकं 1450 रुपये एवढा आहे.

1 लाख रुपये लावणारे केवळ दोन वर्षांतच मालामाल -नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सचा शेअर 5 मे 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 37 रुपयांवर होता. 4 मे 2023 रोजी तो बीएसईवर 1079 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2816 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 5 मे 2021 रोजी नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती तर आता त्याचे  29.25 लाख रुपये झाले असते. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 210.10 रुपये एवढा आहे.

एकावर्षात 308 टक्क्यांनी वधारला शेअर - नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सचा शेअर गेल्या एका एका वर्षात 308 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा शेअर गेल्या वर्षी 4 मे रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 264 रुपयांवर होता. तो 4 मे 2023 ला बीएसईवर 1079 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या सेअरमध्ये 49 टक्यांनी वाढला आहे. कंपनीतील प्रमोटर्सचा वाटा 67.09 टक्के आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 32.91 टक्के आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार