Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर असावा तर असा! या स्टॉकनं 3 महिन्यांत दिला ₹25 कोटींचा परतावा; परदेशी गुंतवणूकदारही तुटून पडले

शेअर असावा तर असा! या स्टॉकनं 3 महिन्यांत दिला ₹25 कोटींचा परतावा; परदेशी गुंतवणूकदारही तुटून पडले

सिंगापूर येथील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सिक्सटीन स्ट्रीट इन्व्हेस्टिंगने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 08:07 PM2023-10-07T20:07:52+5:302023-10-07T20:08:12+5:30

सिंगापूर येथील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सिक्सटीन स्ट्रीट इन्व्हेस्टिंगने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे.

Share market meet the ashish kacholia who earned 25 crore in just 90 days via one stock | शेअर असावा तर असा! या स्टॉकनं 3 महिन्यांत दिला ₹25 कोटींचा परतावा; परदेशी गुंतवणूकदारही तुटून पडले

शेअर असावा तर असा! या स्टॉकनं 3 महिन्यांत दिला ₹25 कोटींचा परतावा; परदेशी गुंतवणूकदारही तुटून पडले

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशीष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांना बम्पर परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे बालू फोर्जचा. या स्मॉल कॅप शेअरपासून आशीष कचोलिया यांनी केवळ तीन महिन्यांतच ₹25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कचोलिया यांनी गेल्या जुलै महिन्यात बालू फोर्जमध्ये 2.16 टक्क्यांची (21,65,500 शेअर) गुंतवणूक केली होती. तेव्हा या शेअरची किंमत ₹115.45 वर होती. आता हा शेअर ₹230.45 वर पोहोचला आहे. यातून त्यांनी केवळ तीन महिन्यांतच जवळपास 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

वार्षिक आधारावर या शेअरने बीएसईवर 230 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या सहा महिन्यांचा परतावा 134.71 टक्के एढा आहे. ईटी नाऊच्या वत्तानुसार, कंपनीतील त्यांच्या स्टेकचे मूल्य आता 49.9 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच, Trendlyne नुसार 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत कचोलिया यांच्याकडे 36 स्टॉक होते. त्यांची एकूण संपत्ती ₹2382.2 कोटीहून अधिक आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक -
सिंगापूर येथील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सिक्सटीन स्ट्रीट इन्व्हेस्टिंगने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. बीएसईच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एफआयआयने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 2.32 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. गुंतवणूकदाराने ₹183.60 प्रति इक्विटी शेअर नुसार, कंपनीचे 25 लाख शेअर खरेदी केले आहेत. अर्थात, सिंगापूर स्थित एफआयआयकडे ₹45.90 कोटी रुपयांचे बालू फोर्ज शेअर आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Share market meet the ashish kacholia who earned 25 crore in just 90 days via one stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.