Adani Group: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचे वातावरण वाढल्याचे चित्र आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहेत. मात्र, यातही काही कंपन्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसत आहेत. यातच अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी अल्पावधीतच शेअर बाजारात जम बसवत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची दिवाळी झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी दिवाळीत अदानी समूहाच्या ६ कंपन्या लिस्ट झाल्या होत्या. यापैकी तीन कंपन्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. या कालावधीत अदानी पॉवरने गुंतवणूकदारांना तीनपट रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेसने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केल्याचे सांगितले जात आहे.
खराब कामगिरीतून बाहेर येत १३ टक्क्यांचा मेगा परतावा
अदानी ग्रुपमधील एका कंपनीची कामगिरी सुरुवातीला अगदी खराब असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तरीही या कंपनीने वर्षभरात चांगला परतावा दिला. अदानी ग्रुपच्या अदानी पोर्ट्स अँड सेझने (एपीएसईझेड) देखील गेल्या दिवाळीपासून जवळपास १३ टक्के परतावा दिला आहे. तसेच अदानी ग्रुपच्या इतर दोन कंपन्यांनी अदानी ग्रीनने गेल्या दिवाळीपासून ७६.७२ टक्के आणि अदानी ट्रान्समिशनला ७१.८८ टक्के दिले आहेत.
दरम्यान, अदानी ग्रुपची आणखी एक कंपनी अदानी विल्मर शेअर्स बाजारात सूचीबद्ध आहेत, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने दोन सूचीबद्ध सिमेंट कंपन्या - ACC आणि अंबुजा सिमेंट्स- विकत घेतल्या आहेत. याचाही सकारात्मक परिणाम शेअर्सवर दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"