Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये (Share Market) गेल्या काही आठवड्यांत अनेक इंव्हेस्टर्सचे पैसे बुडाले आहेत. मात्र, दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांवर याचा फारसा फरक पडलेला नाही. ही रणनीती अनेक वेळा योग्यही ठरते आणि अनेक गुंतवणूकदार यच पद्धतीने कोट्यधीशही होतात. असाच एक स्टॉक आहे V-Gaurd. काही वेळापूर्वी हा स्टॉक केवळ 3 रुपयांचा होता. मात्र, आता याचा रेट 215 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.
केवळ 3 रुपयांपासून सुरू, आता 200च्या पार -V-Gaurd Industries Limited या कंपनीने आजपासून 13 वर्षांपूर्वी शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवले. तेव्हा याच्या एका शेअरची किंमत केवळ 3 रुपये एवढी होती. आता त्या रेटच्या तुलनेत हा स्टॉक जवळपास 7,066% वर ट्रेड करत आहे. शुक्रवारी व्यवहार संपल्यानंतर हा स्टॉक एनएसईवर 214.90 रुपयांच्याही वर होता. एक वेळ तर हा स्टॉक 285 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
बंपर रिटर्न्समुळे गुंतवणूक वाढली -2009 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 1,500 रुपये गुंतवले असतील, आज त्या सर्वांची गुंतवणूक कोट्यवधींची झाली असेल. तसे, या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे सर्व गुंतवणूकदार 13 वर्षात करोडपती झाले असतील. तेव्हा ज्यांनी जवळपास हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल आज ती 70 लाखहून अधिक झाली असेल.
टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.