Join us

जबरदस्त...! देशातील या मोठ्या प्रायव्हेट बँकेनं दिला छप्पर फाड परतावा, 36 हजारचे केले एक कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 6:01 PM

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कधी फायदा तर कधी तोटाही होत असतो. पण, बाजारात असेही काही शेअर्स आहेत, जे गुंतवणूकदारांना बंपर परतावाही देत आहेत.

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार बघायला मिळत आहे. असे असतानाही, लोक शेअरबाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना दिसत आहेत. शेअर बाजारातगुंतवणूकदारांना कधी फायदा तर कधी तोटाही होत असतो. पण, बाजारात असेही काही शेअर्स आहेत, जे गुंतवणूकदारांना बंपर परतावाही देत आहेत. यातच एक शेअर म्हणजे, HDFC या प्रायव्हेट बँकेचा.

प्रायव्हेट बँक -गेल्या 22 वर्षांत HDFC बँकेने, आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. एचडीएफसी बँकेवर लोकांना प्रचंड विश्वास आहे. सध्या एचडीएफसी बँकेकडे देशातील एक दर्जेदार खासगी बँक म्हणून बघितले जाते. या बँकेत देशातील कोट्यवधी लोकांचे अकाउंट्स आहेत.

एचडीएफसी बँकेच्या शेअरवर एक नजर टाकली तर या बँकेचा शेअर 2011 आणि 2019 मध्ये स्प्लिटदेखील झाला. मात्र, असे असतानाही हा बँकेचा शेअर नेहमीच वरच्या दिशेलाच गेल्याचे दिसते. तसेच जानेवारी 1999 ला HDFC Bank चा शेअर 5.52 रुपयांना होता. तो आता 1300 रुपयांवर पोहोचला आहे. एवढेच नाही, तर हा शेअर 1700 रुपयांच्या उच्च पातळीवरही पोहोचला आहे.

कोट्यवधींचा नफा -तसेच, 6 रुपयांच्या दराने खरेदी केलेले 6000 शेअर्स 1725 रुपयांना जरी विकले गेले असते, तर गुंतवणूक दाराने लावलेले 36,000 रुपयांचे 22 वर्षांत 1,03,50,000 रुपये झाले असते. तसेच हे 6000 शेअर्स 1350 रुपयांच्या दराने विकले असते, तर त्याचे 81 लाख रुपये झाले असते. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक