Join us

बम्पर परतावा! 75 पैशांवरून 2000 रुपयांवर पोहोचला हा शेअर, 1 लाखाचे झाले तब्बल 27 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:10 PM

महत्वाची म्हणजे, या कंपनीचा शेअर 75 पैशांवरून तब्बल 2,000 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे लोक आता करोडपती बनले आहेत.

शेअर बाजारात एका केमिकल कंपनीने छप्परफाड परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 200,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. विनती ऑरगॅनिक्स (Vinati Organics), असे या कंपनीचे नाव आहे. 

महत्वाची म्हणजे, या कंपनीचा शेअर 75 पैशांवरून तब्बल 2,000 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे लोक आता करोडपती बनले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 2,289.55 रुपये एवढी होती.

1 लाख रुपयांचे झाले, 27 कोटी रुपये -  विनती ऑर्गेनिक्सचा (Vinati Organics) शेअर 7 नोव्हेंबर 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 75 पैशांना होता. तो 19 मे 2022 रोजी बीएसईवर 2046.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीच्या शेअरने या काळात 200,000 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 7 नोव्हेंबर 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती तशीच कायम ठेवली असती, तर आता ही गुंतवणूक 27.28 कोटी रुपयांवर पोहोचली असती.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारपैसाबाजार