Join us

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तुफान तेजी; 'या' शेअर्सच्या किंमतीत ८ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 11:37 AM

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्समध्ये २१० अंकांची वाढ दिसून आली

मुंबई - शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांदी सुरू आहे. सर्वत्र शेअर खरेदीचं वातावरण दिसून येतंय.भारतीय बाजारपेठेत बुल रन सुरू असल्याचं गुंतवणूकदारांना वाटतंय. यात परदेशी गुंतवणूकदारदेखील सहभागी झाले तर बाजारात आणखी तेजी येऊ शकते असा विश्वास शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना आहे. 

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्समध्ये २१० अंकांची वाढ दिसून आली आणि तो ६९०.९९ च्या पातळीवर काम करत होता. निफ्टी ५७ अंकांच्या वाढीसह २०७४४ अंकांच्या पातळीवर पोहचला. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात किंचित वाढ झाली होती, तर निफ्टी आयटीत किरकोळ कामकाज सुरू आहे.मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स बाजारात पाच टक्क्यांच्या वाढीसह पुढे गेले. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये अदानी समूहाच्या स्टॉकमध्ये वेगाने वाढ होत आहे. अदानी ग्रीन हा असाच एक स्टॉक होता ज्याने गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवली आहे. 

अदानी ग्रीनच्या शेअर्सने मंगळवारी बाजार उघडल्यावर NSE वर व्यवहार करताना या शेअर्सच्या किंमतीनं १२८० रुपयांची पातळी ओलांडली. यानंतरही या शेअरमध्ये खरेदी होताना दिसत आहे.अदानी ग्रीनचा शेअर २४ नोव्हेंबर रोजी ९३८ रुपयांवर बंद झाला होता आणि येथून शेअरने त्याची ९६० रुपयांची रजिस्टेंस तोडून जबरदस्त वेग पकडला. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रापर्यंत तो १२८३ रुपयांवर पोहोचला.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीशेअर बाजार